पिंपरी-चिंचवडमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर जबरदस्तीने बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 19:25 IST2022-05-06T19:03:10+5:302022-05-06T19:25:16+5:30
चिंचवड येथील लॉजवर सहा ते सातवेळा घेऊन जावून फिर्यादीच्या मनाविरुद्ध बलात्कार

पिंपरी-चिंचवडमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर जबरदस्तीने बलात्कार
पिंपरी : मैत्रीच्या संबंधातून लॉजवर येऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार २०१६ ते गुरूवार ( दि. ५ ) २०२२ या कालावधीत बालेवाडी, चिंचवड येथील लॉजवर घडला. या प्रकरणी संबंधित महिलेने वाकड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज अनिल खंडागळे ( वय २८ ) रा. थेरगाव याला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना मैत्रीच्या संबंधातून राज हॉटेल बालेवाडी येथे घेऊन गेला. येथे फिर्यादीला मद्य पाजून त्यामध्ये नशेचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर फिर्यादी यांच्यावर बलात्कार केला. या प्रकाराचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करेल अशी धमकी आरोपीने फिर्यादी यांना दिली. त्यानंतर कामिनी हॉटेल चिंचवड येथील लॉजवर सहा ते सातवेळा घेऊन जावून फिर्यादी यांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला.
याला फिर्यादी यांनी नकार दिल्याने आरोपीने काढलेले व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन बलात्कार केला. आरोपीने वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून २ ते ३ लाख रूपये रोख रक्कम घेतली. तसेच फिर्यादी यांना शारीरीक आणि मानसिक त्रास देऊन त्याच्यावर बलात्कार केला असे फिर्यादीत म्हटले आहे.