बॅंकेत नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १७ लाखांना लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 04:58 PM2022-07-17T16:58:19+5:302022-07-17T16:59:05+5:30
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेची पोलिसांकडे तक्रार
पुणे : स्टेट बँकेत पीओ पदावर नोकरी लावून देतो, असे सांगून दोघांनी बनावट नियुक्तीपत्र देत तब्बल १७ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी खराडी येथील ३२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तुकाराम पाटील व अमित शेट्टे मोन यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदवण्यात आला आहे, हा प्रकार १३ मार्च २०२० पासून आजपर्यंत घडला.
अधिक माहितीनुसार: चुलत दिराच्या ओळखीने फिर्यादी यांची तुकाराम पाटील व अमित शेट्टे यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनी फिर्यादी यांना स्टेट बँक ऑफ इंडियात पीओ पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. तसे नियुक्ती पत्रही ई-मेलवर पाठवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्याकडून १७ लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.