नको त्याठिकाणी बुद्धीचा वापर; बनावट सोने दागिन्यांचा गोलमाल महिलेच्या अंगलटी; सराफांनाच गंडा

By विवेक भुसे | Published: May 8, 2023 04:30 PM2023-05-08T16:30:40+5:302023-05-08T16:30:55+5:30

शक्कल लढवून बनावट सोने विकायला गेली अन् पोलिसांच्या ताब्यात सापडली

A woman's arm full of fake gold jewelry fraud was wearing the bullion | नको त्याठिकाणी बुद्धीचा वापर; बनावट सोने दागिन्यांचा गोलमाल महिलेच्या अंगलटी; सराफांनाच गंडा

नको त्याठिकाणी बुद्धीचा वापर; बनावट सोने दागिन्यांचा गोलमाल महिलेच्या अंगलटी; सराफांनाच गंडा

googlenewsNext

पुणे : हॉलमार्क असलेला सोने घेऊन एक महिला आली. जुने सोने देऊन तिने दुसरा दागिना पसंत केला. हॉलमार्क असल्याने त्यावर विश्वास ठेवून सराफाने तिला नवीन दागिना दिला. प्रत्यक्षात तो बनावट निघाला. अशाच प्रकारे इतर सराफांनाही तिने फसविल्याचे लक्षात आले. हा प्रकार व्हॉटसॲपमार्फत सर्व सराफांपर्यंत पोहचविली गेली होती. अशाच प्रकारे फसवणूक करण्यासाठी ती पुन्हा कस्तुरे चौकातील एका सराफी दुकानात गेली. अन सापडली. पोलिसांनी तिला अटक केली. साक्षी अविनाश सोनी (वय ३२, रा. प्रेमजी जीवन सेनोटेरियम, पुणे स्टेशन, मुळ इटारसी, जि. नर्मदापूर, मध्य प्रदेश) असे या महिलेचे नाव आहे.

याबाबत गणेश पेठेतील एका सराफाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचे कस्तुरे चौकात सराफ दुकान आहे. त्यांच्या व्हॉटसॲपवर सराफांच्या ग्रुपवर दोन महिन्यांपूर्वी एक महिला बनावट दागिने देऊन नवे दागिने घेऊन जात असल्याचे व तिचा फोटो दिला होता. तेव्हा फिर्यादी यांना आपल्याकडेही या महिलेने बनावट दागिने दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती सर्व कामगारांना देऊन ठेवली होती. ही महिला शनिवारी त्याच्या दुकानात पुन्हा आली. तिने सोन्याची बनावट सोनसाखळी आणली होती. त्यावर हॉलमार्कचे चिन्ह होते. ही चैन देऊन तिला सोन्याचे मंगळसुत्र खरेदी करायचे होते. फिर्यादी यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी या महिलेला बाेलण्यात गुंतवले. त्या सोनसाखळीचा तुकडा करुन तो टेस्टिंगला पाठविला. तेव्हा टेस्टिंगचा रिपोर्ट २२ कॅरेट येणे अपेक्षित असताना केवळ ५ कॅरेट आला. तिने तांब्याच्या तारेवर सोन्याचा मुलामा दिला असल्याचे आढळून आले. त्यांनी पोलिसांना सावध केले. पोलिसांनी तातडीने या सराफाचे दुकान गाठून महिलेला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग तपास करीत आहेत.

लेझर मशीनद्वारे हॉलमार्क

बनावट दागिन्यांवर हॉलमार्क कसे याबाबत दत्तात्रय देवकर यांनी सांगितले की, यापूर्वी अनेक जण लेझर मशीनवर टेस्टिंग करुन त्याचे प्रमाणपत्र घेत असत. अशा वेळी अचूक टेस्टिंग केले नाही तर चुकीचे प्रमाणपत्र मिळत होते. आता मात्र नव्या नियमामुळे हा प्रकार बंद होणार आहे.

Web Title: A woman's arm full of fake gold jewelry fraud was wearing the bullion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.