पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखवून संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग
By नम्रता फडणीस | Published: January 3, 2024 04:44 PM2024-01-03T16:44:51+5:302024-01-03T16:45:24+5:30
कंपनीतील अधिकाऱ्याने संगणक तरुणीला पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखवून केबीनमध्ये बोलावून अश्लील कृत्य केले
पुणे: ओैंध भागातील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीतील संगणक अभियंता तरुणीला पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीतील अधिकाऱ्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रत्नेश डांगी (वय ४५, रा. पंचशील टाॅवर्स, खराडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी ओैंध भागातील एका माहिती तंज्ञज्ञान कंपनीत काम करते . या कंपनीत रत्नेश अधिकारी आहे. रत्नेश गेल्या सहा महिन्यांपासून तरुणीचा कामावरुन सुटल्यानंतर पाठलाग करत होता. कामाचा बहाण्याने रत्नेश तिला केबीनमध्ये बोलावून घेऊन त्रास देत असे. त्यानंतर त्याने संगणक अभियंता तरुणीला पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखविले. तिला केबीनमध्ये बोलावून अश्लील कृत्य केले. त्याच्या त्रासामुळे तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे तपास करत आहेत.