हिंजवडीच्या आयटी कंपनीतील इंजिनिअर तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू; पवनानगर परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 03:25 PM2024-02-25T15:25:40+5:302024-02-25T15:26:06+5:30
पवनाधरणाच्या पाण्यात भिजण्याचा आंनद घेण्यासाठी ५ मित्रमैत्रिणी पाण्यात गेले असता पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला
पवनानगर: मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरातील फांगणे गावाच्या हद्दीमध्ये पवनाधरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या हिंजवडी येथील एका खाजगी कंपनीतील इंजिनिअर युवकाचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे. पवनाधरणाच्या पाण्यात भिजण्याचा आंनद घेण्यासाठी ५ मित्रमैत्रिणी पाण्यात गेले असता पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने त्यामधील इंजिनिअर मयंक अखिलेश उपाध्याय (वय.२५, रा फेज.१ लक्ष्मी चौक,हिंजवडी पुणे. मुळ राहणार पानिपत, हरियाणा) येथील असून पवनाधरणाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे.
मित्रमैत्रिणी आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. पंरतु वाचवण्यासाठी स्थानिकांना यश आले नाही. याबाबत सविस्तर माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस चौकशी सुरू आहे. हि घटना आज दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास फांगणे गावाच्या हद्दित घडली असुन त्याठिकाणी लोणावळा ग्रामीण चे पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून पाण्यातून मृतदेह बाहेर काढला आहे. यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गाले, जय पवार, नितीन कडाळे, भिमराव वांळुज यांच्या सह स्थानिकांच्या मदतीने मृतदेह दुपारी ०१:३५ च्या सुमारास बाहेर काढला आहे. त्यानंतर श्छेवदानासाठी खंडाळा येथे नेण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण चे पोलीस तपास जय पवार करत आहेत.