गडावर ट्रेक करताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून तरुणाचा मृत्यू; मुळशी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 05:09 PM2022-12-11T17:09:48+5:302022-12-11T17:15:07+5:30

तरुण गडावर पुढे जाऊन रोप, दोर बांधण्याचे काम करीत होता

A young man fell down 200 feet after a tree broke while trekking to the fort; Incidents in Mulshi Taluka | गडावर ट्रेक करताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून तरुणाचा मृत्यू; मुळशी तालुक्यातील घटना

गडावर ट्रेक करताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून तरुणाचा मृत्यू; मुळशी तालुक्यातील घटना

googlenewsNext

किरण शिंदे/पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील तैलबैला गडावर ट्रेक करताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमनाथ बळीराम शिंदे (वय २५ रा. कात्रज) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

सोमनाथ हा काल त्याच्या नऊ तरुणांसह टेलबैल गडावर ट्रेकसाठी गेले होते. आज सकाळी सोमनाथ हा गडावर पुढे जाऊन रोप, दोर बांधण्याचे काम करीत होता. त्याच्या पाठीमागून दोराच्या साह्याने उर्वरित तरुण गडावर चढाई करणार होते. आज सकाळी साडे नऊ वाजता दोर तुटल्याने सोमनाथ खाली १०० फूट कोसळला. त्यानंतर तेथून पुन्हा १०० फूट आणखी खाली कोसळला. दोनशे फूट खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

Web Title: A young man fell down 200 feet after a tree broke while trekking to the fort; Incidents in Mulshi Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.