बुद्धिमत्तेच्या जोरावर पुणेरी युवकाचा अमेरिकेत डंका; 'जीपीटी ४ ओ' चा टीमलीडर प्रफुल्लचे जगभरात कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 01:57 PM2024-05-17T13:57:25+5:302024-05-17T14:00:08+5:30

चॅट जीपीटीचे ॲप्लिकेशन जीपीटी ४ ओची निर्मिती अमेरिकेत झाली असली, तरी या लोकप्रिय ॲप्लिकेशनच्या निर्मात्या टीमचा लीडर प्रफुल्ल धारीवाल

A young man from Pune was stung by intelligence in America Prafulla the leader of the team of 'GPT4O' is appreciated all over the world | बुद्धिमत्तेच्या जोरावर पुणेरी युवकाचा अमेरिकेत डंका; 'जीपीटी ४ ओ' चा टीमलीडर प्रफुल्लचे जगभरात कौतुक

बुद्धिमत्तेच्या जोरावर पुणेरी युवकाचा अमेरिकेत डंका; 'जीपीटी ४ ओ' चा टीमलीडर प्रफुल्लचे जगभरात कौतुक

सलीम शेख 

शिवणे : सध्या जमाना एआयचा आहे असे आपण म्हणतो, आणि एआय ॲप्लिकेशन्समध्ये बोलबाला आहे तो चॅट जीपीटीचा. चॅट जीपीटी काही सेकंद तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते, निबंध, प्रबंध, बनवून देते इतकेच काय तर तुम्ही दिलेल्या मजकुराची मुद्देसूद मांडणी काही सेकंदांत करून साऱ्यांनाच चाट पाडणारा चॅट जीपीटी सध्या भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतो आहे. या ॲप्लिकेशनच्या जीपीटी ४ ओ याची निर्मिती अमेरिकेत झाली असली, तरी या लोकप्रिय ॲप्लिकेशनच्या निर्मात्या टीममध्ये टीम लीड करणारा संशोधक हा पुणेरी असल्याचे जगासमोर आले आहे. चॅट जीपीटी ॲप्लिकेशन बनविणाऱ्या ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनीच प्रसारमाध्यमावर कौतुक करताना प्रफुल्ल धारीवाल या पुणेरी तरुणाला शाबासकी दिली आहे.

कोथरूड परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील युवक प्रफुल्ल धारीवाल याने अमेरिकेत जाऊन भारताचा नावलौकिक वाढविला. पुण्यातील कोथरूडमध्ये शिक्षण घेतलेला २९ वर्षांचा प्रफुल्ल धारीवाल हा युवक लहानपणापासूनच अतिशय हुशार विद्यार्थी आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड परीक्षेत भारतात प्रथम क्रमांक मिळवला होता. उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. सध्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या चॅट जीपीटी हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी प्रफुल्लची निवड झाली. दिवसरात्र मेहनत घेऊन प्रफुल्लने त्याच्या टीमसोबत चॅट जीपीटी हे ॲप्लिकेशन तयार केले.

प्रफुल्लचे वडील सुशील धारीवाल आणि आई अलका धारीवाल म्हणाले की, शिक्षण घेत असतानाच त्याने विविध देशांत घेतल्या गेलेल्या फिजिक्स ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहेत. २००९ मध्ये चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने सुवर्णपदक मिळविले होते. त्यामध्ये १६ देशात झालेल्या परीक्षेत भारताने सर्वात जास्त ५ सुवर्ण पदके मिळवली होती

चॅट जीपीटीवर असे केले त्याने काम

प्रफुल्ल धारीवाल याने मॅसॅच्युसेट्स युनिर्व्हसिटीमध्ये बीई केले. फेसबुक कंपनीमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर दुसऱ्या वर्षात त्याने चॅट जीपीटीची निर्मिती करणाऱ्या ओपन एआयमध्ये इंटर्नशिप केली. प्रफुल्लमधील प्रचंड बुद्धिमत्ता पाहून ओपन एआय कंपनीने त्याला त्याच कंपनीत नोकरीची ऑफर दिली. चॅट जीपीटीचाच भाग असणाऱ्या जीपीटी ०.४ हे ॲप्लिकेशन तयार करण्याच्या एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी प्रफुल्लकडे देण्यात आली. त्यासाठी त्याला या प्रोजेक्टचे टीम लीडर बनविण्यात आले.

Web Title: A young man from Pune was stung by intelligence in America Prafulla the leader of the team of 'GPT4O' is appreciated all over the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.