Pune | भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांकडून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 10:53 AM2022-11-22T10:53:17+5:302022-11-22T10:54:22+5:30

याप्रकरणी दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे...

A young man was killed by criminals in an inn in Bharti Vidyapeeth police station limits | Pune | भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांकडून तरुणाचा खून

Pune | भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांकडून तरुणाचा खून

googlenewsNext

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : बेटिंगसाठी घेतलेले पैसे परत मिळवण्यासाठी एका तरुणाचे अपहरण करून त्याला जबर मारहाण करण्यात आली. सराईत गुन्हेगारांकडून झालेल्या या मारहाणी एका 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 15 नोव्हेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. 

निखिल उर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय 32, रा. आईसाहेब बिल्डिंग स्वामी सदन आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल अमराळे (वय 35) आणि लहू माने (वय 40) या दोन रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हर्षदा निखिल अनभुले (वय 24) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत निखिल याने आरोपी विशाल अमराळे आणि लहू माने यांच्याकडून बेटिंगसाठी 28 हजार रुपये घेतले होते. हे पैसे परत देण्यासाठी आरोपी विशाल अमराळे यांनी वारंवार निखिल त्याला फोन करून आपली गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी सांगून धमक्या दिल्या. 15 नोव्हेंबर रोजी निखिल याला आरोपींनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरलाईंग बर्ड स्कूल आंबेगाव या ठिकाणी बोलावून घेत कोंडून ठेवले आणि जबर मारहाण केली. 

पाठीवर आणि छातीवर जबर मारहाण झाल्याने निखिल अनभुले याचा मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट अधिक तपास करत आहेत.

Web Title: A young man was killed by criminals in an inn in Bharti Vidyapeeth police station limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.