झोपण्यावरुन झालेल्या वादात तरुणाला दिले पेटवून; पुण्याच्या मुठेश्वर मंदिराजवळील वाचनालयातील घटना

By विवेक भुसे | Published: June 6, 2023 03:41 PM2023-06-06T15:41:15+5:302023-06-06T15:41:24+5:30

दोघे ओळखीचे असून वाचनालयात आले असता झोपण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता

A young man was set on fire in an argument over sleeping The incident at the library near Mutheshwar Temple in Pune | झोपण्यावरुन झालेल्या वादात तरुणाला दिले पेटवून; पुण्याच्या मुठेश्वर मंदिराजवळील वाचनालयातील घटना

झोपण्यावरुन झालेल्या वादात तरुणाला दिले पेटवून; पुण्याच्या मुठेश्वर मंदिराजवळील वाचनालयातील घटना

googlenewsNext

पुणे : झोपण्यावरुन झालेल्या वादात एकाने तरुणाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून त्याला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मिलिंद सिद्धपा होसकुटी (वय ३८, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) हे भाजले आहेत. त्यांच्या छातीला व हाताला भाजले आहे. विश्रामबाग पोलिसांनी बालमुकुंद पंडीत (वय ५९, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील मुठेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या वाचनालयात सोमवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते फिरस्ते आहेत. फिर्यादी यांना रविवारी रात्री घरी जाण्यास उशीर झाल्याने ते मुठेश्वर मंदिरात झोपण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी झोपण्यावरुन त्यांचा पंडित याच्याशी वाद झाला. तेव्हा पंडितने त्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा फिर्यादी हे बाजूला असलेल्या वाचनालयात जाऊन झोपले. ते झोपेत असताना पंडित याने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला आग लावून दिली. त्यात त्यांच्या छातीला व हाताला भाजले आहे. शेजारील बॅनरही जळून गेला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पंडित याला अटक केली आहे. पंडित याने त्यांच्या अंगावर कोणता ज्वलनशील पदार्थ टाकला, याची माहिती देत नसून सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.

Web Title: A young man was set on fire in an argument over sleeping The incident at the library near Mutheshwar Temple in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.