Pune | पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 01:50 PM2023-04-13T13:50:06+5:302023-04-13T13:51:02+5:30

ही घटना कामशेत येथे मंगळवारी (दि. ११) दुपारच्या सुमारास घडली आहे....

A young man who had gone for tourism died after drowning in the Indrayani river | Pune | पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Pune | पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

googlenewsNext

कामशेत (पुणे) : दापोडी येथून कामशेत येथे फिरण्यासाठी आलेल्या पाच तरुणांपैकी एका तरुणाचा इंद्रायणी नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना कामशेत येथे मंगळवारी (दि. ११) दुपारच्या सुमारास घडली आहे.

हर्ष लक्ष्मण अडसूळे (वय १७, रा. दापोडी, पुणे) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दापोडी येथून पाच मित्र मंगळवार, दि. ११ एप्रिल रोजी कामशेत परिसरात फिरण्यासाठी आले होते. तेव्हा हे सर्व जण दुपारच्या सुमारास येथे असणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. त्यातील हर्ष अडसुळे या तरुणाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच कामशेत पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि वन्यजीव मावळ रक्षक संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि आपदा मित्र मावळ हे घटनास्थळी पोहोचले आणि शोधकार्य सुरू केले. पाण्यात बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास यंत्रणांना यश आले.

शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ टीमचे नीलेश गराडे, अनिल आंद्रे, दिगंबर पडवळ, राहुल दुर्गे, अमित बलकवडे, योगेश दळवी, विशाल जव्हेरी यांनी सर्च ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.

Web Title: A young man who had gone for tourism died after drowning in the Indrayani river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.