वीज जोडणीसाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू; खेडमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 09:42 PM2022-03-01T21:42:31+5:302022-03-01T21:44:17+5:30
ट्रान्सफार्मवर चढून वीज जोडणी करत असताना वीजेचा शॉक लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे
राजगुरुनगर : ट्रान्सफार्मवर चढून वीज जोडणी करत असताना वीजेचा शॉक लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू
झाला आहे. हि घटना पाईट (ता. खेड ) येथे घडली असुन संदिप नामदेव भोकसे ( वय ३४ ) असे शॉक लागुन मृत्यू
झालेल्या तरुणाचे नाव आहे.
थकीत वीजबीलामुळे कृषी पंपाची वीजवितरण कंपनीने शेतक-यांची वीजेची कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला असला तरी पिके वाचवण्यासाठी मात्र थेट ट्रान्सफार्मरवर चढून वीज कनेक्शन टाकण्याच्या नादात एका तरुणांचा वीजेचा शाँक लागुन जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना पाईट परिसरात घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाईट येथील रौधंळवाडी परीसरातील विरोबावस्ती जवळ भामाआसखेड धरणालगतच्या ट्रान्सफार्मरवर ची सात कृषी पंपाची कनेक्शन तोडण्यात आली होती. पाईट येथील कोमलवाडीतील जुजबी इलेक्ट्रिक माहिती असणारा संदिप नामदेव भोकसे यांचा काही वीजकनेक्शनचा संबध नसताना कोणत्या तरी शेतक-याने स्वतः ची वीज कनेक्शन जोडण्यासाठी बोलावले. संदिप भोकसे डीपीतील वीज पुरवठा खंडीत करुन थेट ११ केव्हीच्या ट्रान्सफार्मरवर चढून वीज जोडणी करताना वीजेचा झटका बसल्याने खाली पडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि. १ )सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
ही घटना घडताच शेतकरी पळुन गेल्याची चर्चा आहे. तर याबाबतची माहिती जागामालक देवराम पोतेकर यांनी वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर सहा वाजता घटनास्थळाचा वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी पंचनामा केला.