तरुणाचे हाॅटेल टाकण्याचे स्वप्न; तीन दिवसांत दाेन पेट्राेल पंपांवर टाकले दराेडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 02:25 PM2022-11-20T14:25:56+5:302022-11-20T14:29:31+5:30

दीड लाखांची रक्कम लुटून नेणाऱ्या टाेळीतील चाैघांना पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले

A young man's dream of leaving a hotel; In three days two petrol pumps were pumped every day | तरुणाचे हाॅटेल टाकण्याचे स्वप्न; तीन दिवसांत दाेन पेट्राेल पंपांवर टाकले दराेडे

तरुणाचे हाॅटेल टाकण्याचे स्वप्न; तीन दिवसांत दाेन पेट्राेल पंपांवर टाकले दराेडे

Next

पुणे: तीन दिवसांत दाेन पेट्राेल पंपांवर दराेडे टाकत दीड लाखांची रक्कम लुटून नेणाऱ्या टाेळीतील चाैघांना पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. अटक आराेपींपैकी एकास स्वत:चे हाॅटेल सुरू करायचे हाेते, त्यासाठी त्याने पेट्राेल पंपावर दराेडा टाकल्याचे तपासातून उघडकीस आल्याची माहिती पाेलिस अधीक्षक अंकित गाेयल यांनी दिली.

करण युवराज पठारे (वय २०, रा. गुजरमळा, शिरूर), राेहन साेमनाथ कांबळे (वय २०, रा. बाेर्हाडेमळा, शिरूर), अजय जगन्नाथ माळी (वय २३) आणि अजय साेमनाथ लकारे (वय २१ दाेघेही, रा. माठ, नेहरवाडी, ता. श्रीगाेंदा) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. या गुन्ह्यांतील फरार असलेल्या दाेघांचा पाेलीस शाेध घेत आहेत.

शिरूरमधील पाषाणमळा येथे दि. १२ राेजी सहा जणांनी दराेडा टाकत कामगारांजवळील ५० हजारांची राेख रक्कम चाेरून नेली. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच १५ तारखेला पुन्हा न्हावरा गावच्या हद्दीतील पेट्राेल पंपावरील कामगारांना काेयत्याचा धाक दाखवित चाेरट्यांनी १ लाखाची राेकड लुटली. तीन दिवसांत दाेन पेट्राेल पंपांवरील रक्कम लुटल्याने एकच खळबळ उडाली हाेती.

स्थानिक पाेलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेची दाेन पथके चाेरट्यांचा शाेध घेत हाेते. पाेलिसांनी सीसीटीव्ही चित्रफिती आणि गाेपनीय खबऱ्यामार्फत आराेपींची माहिती मिळविली आणि चाैघांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक सचिन काळे, गणेश जगदाळे, अमित सिद पाटील, तुषार पंदारे, राजू माेमीन यांच्या पथकाने हे गुन्हे उघडकीस आणले. गुन्ह्यांत वापरलेले चार काेयते जप्त केले आहेत. न्यायालयाने आराेपींना २३ नाेव्हेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. गुन्ह्यांचा तपास शिरूर ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.

असा टाकला दराेडा

आराेपी पठारेला व्यवसायात ताेटा झाला हाेता. तसेच त्याचे स्वत:चे हाॅटेल टाकण्याचे स्वप्न हाेते. त्यामुळे पदवीला शिक्षण घेणारा मित्र राेहन, विटभट्टीवरील कामगार माळी आणि लकारे अशी सहा जणांची टाेळी तयार केली. रात्रीच्या वेळी थंडी वाढल्याने पेट्राेल पंपावरील कामगार रूममध्ये एकत्रित बसलेे हाेते. याच संधीचा गैरफायदा घेत चाेरट्यांनी सर्वांना एकत्रित गाठले. त्यांना काेयत्याने जीवे मारू असा दम देत रक्कम घेत धूम ठाेकली.

Web Title: A young man's dream of leaving a hotel; In three days two petrol pumps were pumped every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.