Pune: वाद मिटवण्यासाठी तरुणीला बोलावून केली मारहाण, तीन मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा

By नितीश गोवंडे | Published: June 20, 2024 07:41 PM2024-06-20T19:41:37+5:302024-06-20T19:42:24+5:30

हा प्रकार ११ मार्च व २२ दरम्यान सेनापती बापट रोडवरील एका शासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये व वडारवाडी येथील दीप बंगला चौकात घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

A young woman was called to settle a dispute and beaten, three friends were charged with molestation. | Pune: वाद मिटवण्यासाठी तरुणीला बोलावून केली मारहाण, तीन मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा

Pune: वाद मिटवण्यासाठी तरुणीला बोलावून केली मारहाण, तीन मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा

पुणे : मैत्रीत झालेला वाद मिटवण्यासाठी बोलावून घेत तरुणीला अश्लील शिवीगाळ करुन धमकी देऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ११ मार्च व २२ दरम्यान सेनापती बापट रोडवरील एका शासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये व वडारवाडी येथील दीप बंगला चौकात घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३२ वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. १९) चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रतीक बाळकृष्ण काकडे (वय ३०), प्रज्योत बाळकृष्ण काकडे (वय ३२, रा. बालाजी अपार्टमेंट, नवी सांगवी) आणि आश्विन पवार (वय २९, रा. वसई) यांच्यावर विनयभंगासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय कार्यालयात काम करतात. आरोपी प्रतीक आणि फिर्यादी एकमेकांचे मित्र असून, त्यांच्यात वाद झाले होते. मैत्रीत झालेला वाद मिटवण्यासाठी आरोपी प्रतीक याने फिर्यादी यांना फिर्यादी काम करत असलेल्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये बोलावून घेतले. फिर्यादी तिथे गेल्या असता आरोपी प्रज्योत त्याठिकाणी होता. त्याने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी त्यांच्या दुसऱ्या ऑफिसकडे निघाल्या.

आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन दीप बंगला चौकात अडवून शिवीगाळ करून धमकी दिली. यानंतर फिर्यादी यांना पुन्हा वाद मिटवण्यासाठी प्रतीक याने बोलावून घेतले. त्यावेळी आरोपींनी अश्लील बोलून शिवीगाळ केली. तर प्रज्योत आणि आश्विन यांनी फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शामल पाटील या करत आहेत.

Web Title: A young woman was called to settle a dispute and beaten, three friends were charged with molestation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.