कोयत्याने वार, तरुणीचा खून अन् बघ्यांची गर्दी; येरवड्यातील त्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:20 IST2025-01-09T13:18:48+5:302025-01-09T13:20:08+5:30
व्हिडिओत आरोपी कृष्णा कनोजिया हातात कोयता घेऊन दिसत आहे. तर शुभदा कोदारी ही जखमी अवस्थेत खाली पडलेली दिसून येत आहे.

कोयत्याने वार, तरुणीचा खून अन् बघ्यांची गर्दी; येरवड्यातील त्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल..
किरण शिंदे
पुणे - येरवडा परिसरातील नामांकित कंपनीच्या आवारात तरुणाने सहकारी तरुणीवर कोयत्याने वार केले होते. गंभीर जखमी झालेल्या या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. शुभदा शंकर कोदारे (वय २८) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजिया (वय ३०) याला अटक केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आता एक व्हिडिओ समोर आलाय. त्यामध्ये आरोपी कृष्णा कनोजिया हातात कोयता घेऊन दिसत आहे. तर शुभदा कोदारी ही जखमी अवस्थेत खाली पडलेली दिसून येत आहे. त्याशिवाय या ठिकाणी बघायची गर्दी देखील मोठी असल्याचे दिसून येते.
कोयत्याने वार, तरुणीचा खून अन् बघ्यांची गर्दी; येरवड्यातील त्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल..#pune#yerwada#Police#crimepic.twitter.com/5FmsZk5Iyd
— Lokmat (@lokmat) January 9, 2025
येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही नामांकित कंपनी आहे. आरोपी कृष्णा कनोजिया याने आर्थिक वादातून शुभदा हिच्यावर कोयत्याने वार केले होते. दरम्यान यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये शुभदा ही खाली पडलेली दिसत आहे. तर आरोपी कृष्णा हा कोयता घेऊन तिच्या अवतीभवती फिरताना दिसतोय. गंभीर जखमी अवस्थेतही शुभदाने झालेल्या प्रकाराची फोनवरून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या जवळील फोनही आरोपीने हिसकावून घेतला. हा संपूर्ण प्रकार घडत असताना त्या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. मात्र कोणीही कृष्णा याला अडवताना दिसत नाही. शेवटी आरोपी कृष्णा कनोजिया यांनी हातातील कोयता खाली टाकल्यानंतर नागरिक धावून आले. आणि त्याला मारहाण केली.
दरम्यान शुभदा आणि आरोपी कृष्णा सहकारी होते. एकाच कंपनीत ते कामही करायचे. शुभदा हिने वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून कृष्णा याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच आरोपी कृष्णा याला शुभदा हिने वडिलांच्या आजारपणाचे खोटे कारण सांगून आपल्याकडून पैसे घेतल्याचे समजले होते. त्यामुळे उसने पैसे तो परत मागत होता. शुभदा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होती. त्यामुळे संतापलेल्या कृष्णा याने मंगळवारी कंपनीच्या आवारातच तिच्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या शुभदा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटकेत आहे.