आधार नूतनीकरण ठरते नागरिकांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:58+5:302021-02-09T04:12:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने आता सर्व शासकीय कामांसाठी, निवासी पुरावा, जन्म तारखेचा पुरावा, शाळा, महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया ...

Aadhaar renewal is a headache for citizens | आधार नूतनीकरण ठरते नागरिकांसाठी डोकेदुखी

आधार नूतनीकरण ठरते नागरिकांसाठी डोकेदुखी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासनाने आता सर्व शासकीय कामांसाठी, निवासी पुरावा, जन्म तारखेचा पुरावा, शाळा, महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया आदी विविध ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यात हे आधार अपडेट नसेल, तर ग्राह्य धरले जात नाही. यामुळे आधार नोंदणी आणि आधार नूतनीकरण करण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. त्या गर्दीमुळे अनेक वेळा हेलपाटे देखील मारावे लागतात.

केंद्र शासनाने आता सर्व प्रकारच्या शासकीय कामात आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यात हे आधार कार्ड अद्यावत असणे गरजेचे आहे. त्यामुळे आधार कार्ड नुतनीकरणासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे. तर एसटी बस प्रवासात ज्येष्ठांना ५० टक्के सवलतीसाठी अद्ययावत आधारकार्डची सक्ती करण्यात येत असल्याने ज्येष्ठांना उतारवयात आधार केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल 482 ठिकाणी आधार नोंदणी केंद्र असून, नागरी सुविधा केंद्र, बँका, पोस्ट ऑफिस आदी ठिकाणी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये दररोज ठराविक लोकांचेच आधार नूतनीकरण केले जाते. यामुळे नंबर आला नाही तर पुन्हा, पुन्हा वेळ काढून आधार नोंदणीसाठी जावे लागते.

--------

जिल्ह्यातील एकूण आधार केंद्रे : 482

जिल्हा प्रशासन- 148

केंद्र सरकार- 93

बँका- सुमारे 97

पोस्ट ऑफिस- 144

----------

यासाठी करावे लागते आधार नूतनीकरण

आपल्या पत्त्यात बदल झाला असेल, नावात काही बदल असल्यास, मोबाईल नंबर बदला असल्यास किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी आधार कार्डत बदल करण्यासाठी कार्डचे नूतनीकरण अनिवार्य आहे.

---------

---- म्हणून ''आधार'' आवश्यक

बँकेपासून ते इतर शासकीय कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आता वास्तव्याचा पुरावा आणि ओळखपत्र म्हणूनही ‘आधार कार्ड’ वापरले जात आहे. आधार क्रमांकासह, क्यूआर कोडची सुविधा देखील आधार कार्डवर आहे, जी आपल्याला आपली वेगळी ओळख देते. यामुळेच सध्या आधार कार्डला प्रचंड महत्त्व आले आहे.

----

आधार नोंदणी, नूतनीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट

पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल 482 केंद्रांवर आधार नोंदणी व नूतनीकरण करण्याचे काम केले जाते. परंतु अनेक वेळा आपल्या भागात नक्की कुठे आधार नोंदणी केद्र आहे हेच लोकांना कळत नाही. शासनाने यासाठी appointments.uidai.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले असून, आपल्या परिसरातील केंद्रांची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकतो.

Web Title: Aadhaar renewal is a headache for citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.