वेल्ह्यात १२४ गावांसाठी आधार केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:26+5:302021-09-22T04:11:26+5:30
वेल्हे तालुक्यात एकही आधार केंद्र उपलब्ध नव्हते. तालुक्यात १२४ गावे असून अनेक वर्षांपासून आधार केंद्राच्या प्रतीक्षेत वेल्हे तालुक्यातील नागरिक ...
वेल्हे तालुक्यात एकही आधार केंद्र उपलब्ध नव्हते. तालुक्यात १२४ गावे असून अनेक वर्षांपासून आधार केंद्राच्या प्रतीक्षेत वेल्हे तालुक्यातील नागरिक होते. परंतु नव्यानेच आधार केंद्राची सुरुवात झाल्याने वेल्हेकराची प्रतीक्षा संपली आहे. वेल्हे तहसील कार्यालयासमोर आधार केंद्र उभारण्यात आले असून, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डमधील दुरुस्तीसाठी नागरिकांनी या केंद्राचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी केले आहे.
वेल्हे तहसील कार्यालयासमोर प्रांताधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या हस्ते आधार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.