आपटी गाव रस्त्यापासून वंचित

By Admin | Published: April 8, 2016 12:51 AM2016-04-08T00:51:33+5:302016-04-08T00:51:33+5:30

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शिनोली, गंगापूर या थोड्या सुधारलेल्या गावांजवळ परंतु डोंगरमाथ्यावर वसलेले आपटी हे एक आदिवासी गाव

Aapati village is deprived of the road | आपटी गाव रस्त्यापासून वंचित

आपटी गाव रस्त्यापासून वंचित

googlenewsNext

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शिनोली, गंगापूर या थोड्या सुधारलेल्या गावांजवळ परंतु डोंगरमाथ्यावर वसलेले आपटी हे एक आदिवासी गाव. स्वातंत्र्यपूर्व आधीपासून हे गाव येथे वसलेले आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरीही या गावाला दळणवळणासाठी अद्यापही रस्ता न मिळाल्याने आजही येथील गावकरी एक प्रकारे अज्ञातवासात राहात आहेत.

या गावाला रस्ता होण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार निवेदने दिली. पिढ्यांमागून पिढ्या सरल्या. मात्र रस्ता होण्याऐवजी मागण्या-निवेदनांना प्रत्येक वेळी सरकार दरबारी केराचीच टोपली मिळत आली आहे. मंजूर रस्त्याला वन विभागाच्या हरकतीमुळे आपटीच्या आदिवासींचे जिणे अवघड झाले आहे. रस्त्यासाठी आता गावकऱ्यांनी शेवटची लढाई हाती घेतली आहे. ११ एप्रिलपासून रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
आपटी (ता.आंबेगाव) हे गाव आदिवासी ५व्या अनुसूचित क्षेत्रातील गाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिनोली व गंगापूर गावापासून जवळ असलेले हे गाव उंच डोंगर माथ्यावर वसलेले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ५००च्या वर असून, सुमारे ६० ते ७० आदिवासी कुटुंबे येथे पिढ्यान्पिढ्यांपासून वास्तव्यास आहेत. गावाच्या खालचा डोंगर हा वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने या गावाच्या विकासाला एक प्रकारची खिळ बसली आहे.
दळणवळणाच्या गैरसोयीअभावी मृत व्यक्तींना घरापर्यंत नेणे शक्य नसल्याने त्यांचेही दफन रस्त्यातच उरकावे लागते. दळणवळणाच्या गैरसोयींमुळे आपटीच्या ग्रामस्थांना जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
वारंवार अर्ज-विनवण्या करूनही, तुमची फाईल पुढे नागपूरला पाठविली आहे, मंजुरी आली की कळविले जाईल, अशी उत्तरे वन विभागाकडून दिली जात असली, तरी पिढ्यांमागून पिढ्या उलटून चालल्या, तरीही वन विभागाची परवानगी मिळत नसल्याने दळणवळणाच्या गैरसोयीपाई आपटीच्या गावकऱ्यांना मात्र हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार अर्ज विनंत्या करून थकलेल्या ग्रामस्थांनी आता शेवटची लढाई लढण्याचे ठरविले आहे. रस्त्याच्या मागणीसाठी ११ एप्रिल २०१६ पासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असल्याचे एका लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे.
माजी विधासभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय घोडेगाव यांना निवेदन दिले आहे. ११ एप्रिलपासून आपटी ग्रामस्थांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Aapati village is deprived of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.