"आरारारा...खतरनाक.." गाण्याचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 09:30 PM2021-05-17T21:30:40+5:302021-05-17T21:44:22+5:30

मुळशी पॅटर्न, देऊळबंद चित्रपटाचे गीतकार, प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांनी चित्रपट सृष्टीत छाप पाडली होती.

"Aararara ... khatarnaak..." song lyricist and writer-director Pranit Kulkarni passed away | "आरारारा...खतरनाक.." गाण्याचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचं निधन 

"आरारारा...खतरनाक.." गाण्याचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचं निधन 

Next

पुणे : मुळशी पॅटर्न, देऊळबंद चित्रपटाचे गीतकार व प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यात सोमवारी(दि.१७) निधन झाले.त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटातील 'आरारारा खतरनाक' या गाण्याने रसिकांना प्रचंड भुरळ घातली.

'शिवबा ते शिवराय' दृकश्राव्य कार्यक्रम, 'जीवन यांना कळले हो' स्टेज रियालिटी शोचे त्यांंनी लेखन व दिग्दर्शन केले होते. "सुरक्षित अंतर ठेवा या नाटकाचे ते लेखक, दिग्दर्शक होते. प्रवीण तरडे व प्रणित कुलकर्णी हे दोघे खूप वर्षापासूनचे मित्र होते. 

फिरोदिया करंडक स्पर्धा गाजवून प्रणित कुलकर्णी यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी गीतलेखन आणि ऑल द बेस्ट या टीव्ही के मालिकेचे लेखन दिग्दर्शन केले होते. तसेच लोकप्रिय झालेल्या 'लक्ष्य' या मालिकेचंही लेखक होतेे.

गीतकार आणि म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून प्रणित यांनी बराच काळ काम केले आहे. सर्जनशील निर्मिती करण्याच्या वेडानं त्या झपाटलेल्या  दोघांनी देऊळबंद हा चित्रपट दिग्दर्शित केला आहेत. सिनेमाचं लेखनही त्यांनी मिळूनच केलं होते.

'देऊळ बंद' या यशस्वी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीतलेखक असलेले प्रणित कुलकर्णी 'सुरक्षित अंतर ठेवा' या नाटकाद्वारे रसिक प्रेक्षकांच्या पुनर्भेटीला आले आहेत. एप्रिल २०१७ मध्ये रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर झाला.

Web Title: "Aararara ... khatarnaak..." song lyricist and writer-director Pranit Kulkarni passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.