अबब! दौंड येथील भीमा नदीत आढळली शंकराची १ टन वजनाची पुरातन मूर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 10:23 PM2020-12-26T22:23:52+5:302020-12-27T11:16:37+5:30

आणखी अवशेष सापडण्याची शक्यता

Abb! An ancient idol of Lord Shiva weighing 1 ton was found in the river Bhima at Daund | अबब! दौंड येथील भीमा नदीत आढळली शंकराची १ टन वजनाची पुरातन मूर्ती 

अबब! दौंड येथील भीमा नदीत आढळली शंकराची १ टन वजनाची पुरातन मूर्ती 

googlenewsNext

दौंड : येथील भीमा नदी पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे. मूर्तीचे तोंड पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे.

दौंड-नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामातील पूल उभारला आहे. या पूलाच्या बाजूलाच दुसरा रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात ही मूर्ती सापडली. कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला ठेवली आहे. स्थानिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली आहे. मात्र, मूर्तीचे वजन जास्त असल्याने ही मूर्ती वाहून येऊ शकत नाही. ती या ठिकाणची असल्याची माहिती काही तज्ञांनी व्यक्त केली. मूर्तीच्या मुखाचा भाग सापडला असून याच परिसरात इतर अवशेषही सापडण्याची शक्यता आहे.

पुरातनकालीन मूर्ती दौंड परिसरातलीच
पाण्याचा कितीही मोठा प्रवाह असला तरी १ टन दगडाच्या वजनाची मूर्ती दूरवरुन वाहून येऊ शकत नाही. फार तर इकडे तिकडे जवळ अंतरावर या मूर्तीची हालचाल पाण्याच्या प्रवाहामुळे होऊ शकते. गेल्या दोन वर्षात भीमा नदीला जोराचा पाण्याचा प्रवाह असलेला पूर आलेला नाही. त्यामुळे ही पुरातनकालीन मूर्ती या ठिकाणचीच असण्याची शक्यता आहे.

- रवींद्र जाधव, सेवा निवृत्त पाटबंधारे अभियंता

Web Title: Abb! An ancient idol of Lord Shiva weighing 1 ton was found in the river Bhima at Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :daund-acदौंड