अपहरणप्रकरणी शिक्षा
By admin | Published: December 24, 2016 06:39 AM2016-12-24T06:39:42+5:302016-12-24T06:39:42+5:30
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळवल्याप्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा
पुणे : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळवल्याप्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पाद यांनी सुनावली. ही घटना ९ मार्च ते १४ एप्रिल २०१५ या कालावधीत घडली होती. दंड न भरल्यास आणखी एक वर्षाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली.
गणेश गोरख जाधव (वय २४, रा. चांडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी रांजणगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. गणेश याने त्या मुलीला शिरूर तालुक्यातील कारेगाव येथून पळवून नेले होते. तो विवाहित असून, त्याला तीन मुले आहेत. पीडित मुलगी खेळण्यासाठी त्याच्या घरी जात होती.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील विजय पाटील यांनी चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.