व्याजाने दिलेले पैसे वसुलीसाठी 'संमोहन तज्ञाचे' अपहरण, पुण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 11:15 AM2020-01-05T11:15:37+5:302020-01-05T11:16:43+5:30

उद्योजक, ढाबा मालकाविरोधात गुन्हा दाखल

Abduction of hypnosis specialist for recovery of interest payments in pune, FIR lodged | व्याजाने दिलेले पैसे वसुलीसाठी 'संमोहन तज्ञाचे' अपहरण, पुण्यात गुन्हा दाखल

व्याजाने दिलेले पैसे वसुलीसाठी 'संमोहन तज्ञाचे' अपहरण, पुण्यात गुन्हा दाखल

Next

पुणे/ पाषाण: व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी संमोहन तज्ञ  महेश काटे यांचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी औंध येथील उद्योजक नाना गायकवाड व तात्याचा ढाबा हॉटेलचे मालक सचिन वाळके यांच्यासह दोन जणांवर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश काटे यांनी यांचे मावसभाऊ सचिन वाळके यांच्या ओळखीने उद्योजक नाना गायकवाड यांच्याकडून २०१७ मध्ये ३० लाख रुपये उसने घेतले होते. यातील १० लाख रुपये त्यांनी त्या वर्षी दिले होते़ उरलेल्या २० लाखापोटी ते दर महिना ८० हजार रुपये देत होते़ अशा प्रकारे त्यांनी १६ लाख रुपये रोख स्वरूपात परत दिले होते व बाकीची रक्कम काही अडचणींमुळे थोड्या वेळाने परत देणार असल्याचे सांगितले. 

दरम्यान सचिन वाळके याने महेश काटे यांना शुक्रवारी  ३ जानेवारी रोजी दीड वाजण्याच्या सुमारास बाणेर येथील तात्याचा ढाबा हॉटेल येथे बोलून घेतले. तात्याचा ढाबा या हॉटेलवर सचिन वाळके व विकास बालवडकर यांनी  त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत स्विफ्ट गाडीत बसवून घेऊन गेले़ सुसगाव येथील एन एस जी या नाना गायकवाड याच्या आलिशान फार्म हाऊसवर महेश काटे यांना ठेवण्यात आले. नाना गायकवाड व त्याच्या साथीदाराने काटे याला मारहाण केली. मारहाणी दरम्यान पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत. महेश काटे यांची प्रॉपर्टी घर व जमीन लिहून दे असे नाना गायकवाड यांनी धमकावले  व मारहाण केली. या मारहाणीमध्ये महेश काटे बेशुद्ध पडले.  यानंतर काटे यांचे मावसभाऊ संदीप वाळके यांनी मध्यस्थी करत काटे यांना घरी आणले. व्याजाने दिलेले पैसे मिळवण्यासाठी केलेली मारहाण व अपहरण तसेच बंदुकीचा धाक दाखवल्या प्रकरणी तसेच दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी नाना शंकर गायकवाड (रा़ औंध), सचिन वाळके (रा़ बाणेर), राजाभाऊ ,विकास बालवडकर यांच्या विरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Abduction of hypnosis specialist for recovery of interest payments in pune, FIR lodged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.