सोमवारी रंगणार ‘अभंगरंग’
By admin | Published: June 30, 2017 03:55 AM2017-06-30T03:55:49+5:302017-06-30T03:55:49+5:30
‘भक्तिगीत कल्पतरू, भक्तीरस हा गोड’ याची प्रचिती देणारी, आषाढी एकादशीचे औचित्य साधून रसिकांना भक्तीरसाच्या भावाची
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘भक्तिगीत कल्पतरू, भक्तीरस हा गोड’ याची प्रचिती देणारी, आषाढी एकादशीचे औचित्य साधून रसिकांना भक्तीरसाच्या भावाची अनुभूती देणारी आणि विठ्ठलाचा भक्तीरस गायनातून आळवण्याची मेजवानी देणारी ‘अभंगरंग’ ही अद्भूत मैफल पुणेकर रसिकांना सोमवारी अनुभवता येणार आहे. शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भक्तिगीतांचा सुरेल आणि भावस्पर्शी आविष्कार कोथरूडमधील पंडित फार्म्स येथे सायंकाळी ५.३० वाजता रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक असून केसरी टूर्स, चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशन, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स हे आहेत. काका हलवाई स्वीट सेंटर, कावरे आईस्क्रिम, शिवसाई मोटार ड्रायव्हिंग स्कूल सहप्रायोजक आहेत. फॅशन पार्टनर पँटलून्स असून आऊटडोअर पार्टनर धीरेंद्र अॅडव्हर्टायझर आहेत.
लोकमत सखी मंचाच्या वतीने यूएसके फाउंडेशन प्रस्तुत व कोहिनूर ग्रूपच्या सहयोगाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सोमवारी
(दि. ३) ‘अभंगरंग’ या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये पं. शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे व
जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुमधूर गीतांचा व अभंग गायनाचा आस्वाद घेण्याची संधी लोकमत सखी मंच सभासदांना आणि वाचकांना मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), निखिल फाटक (तबला), ओंकार दळवी (पखवाज), आदित्य आपटे (टाळ) यांची सुरेल साथसंगत लाभणार आहे. अनय गाडगीळ यांचे संयोजन, तर मिलिंद कुलकर्णी यांचे निवेदन कार्यक्रमाची रंगत वाढवेल. आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित केलेला भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम रसिकांसाठी सुमधूर पर्वणीच ठरणार आहे.
लोकमतच्या वाचकांना प्रवेश खुला
लोकमत सखी मंचच्या सभासदांसाठी ओळखपत्रावर विशेष निमंत्रण असून ‘लोकमत’च्या वाचकांसाठी प्रवेश खुला आहे.
वेळ : सोमवार, दि. ३ जुलै, २०१७ रोजी सायं. ५.३० वाजता
स्थळ : पंडित फार्म्स, न्यू डीपी रोड, कोथरूड.