रिक्षा चालकांना सक्तीचा केलेला Fitness Certificate दंड रद्द करावा; सिद्धार्थ शिरोळेंची अधिवेशनात मागणी

By राजू इनामदार | Published: July 5, 2024 05:02 PM2024-07-05T17:02:29+5:302024-07-05T17:04:53+5:30

दररोज ५० रूपये अशा या दंडाच्या विरोधात देशभरातील रिक्षाचालक आंदोलन करत असून पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केले आहे

Abolition of mandatory vehicle fitness certificate fines for rickshaw pullers Siddharth Shirole demand in the convention | रिक्षा चालकांना सक्तीचा केलेला Fitness Certificate दंड रद्द करावा; सिद्धार्थ शिरोळेंची अधिवेशनात मागणी

रिक्षा चालकांना सक्तीचा केलेला Fitness Certificate दंड रद्द करावा; सिद्धार्थ शिरोळेंची अधिवेशनात मागणी

पुणे: रिक्षा चालकांना सक्तीचा केलेला वाहन योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate) दंड त्वरीत रद्द करावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभा अधिवेशनात सरकारकडे केली. दररोज ५० रूपये अशा या दंडाच्या विरोधात देशभरातील रिक्षाचालक आंदोलन करत असून पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व रिक्षा संघटनांनी एकत्रित आंदोलन करत संप पुकारला असल्याची माहिती शिरोळे यांनी विधानसभेत दिली.

रिक्षा चालकांना त्यांची रिक्षा प्रवासी वाहतूकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून घ्यावे लागते. त्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा नव्याने प्रमाणपत्र घेईपर्यंतच्या कालावधीसाठी प्रत्येक दिवशी ५० रूपये याप्रमाणे दंड करण्याची तरतुद सरकारने अलीकडेच केली. शिरोळे यांनी विधानसभेत सांगितले की ही तरतुद रिक्षाचालकांवर अन्याय करणारी आहे.

रिक्षा चालली तर व्यवसाय होतो. दररोज कमवायचे व त्यातून घर चालवायचे असा हा व्यवसाय आहे. त्यात दररोज ५० रूपये याप्रमाणे दंड झाला तर गरीब रिक्षाचालकांना तो जमा करणे अशक्य होईल. त्यामुळे हा दंड रद्द करावा व रिक्षाचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
 

Web Title: Abolition of mandatory vehicle fitness certificate fines for rickshaw pullers Siddharth Shirole demand in the convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.