अनेक व्यंगांमुळे उच्च न्यायालयाने दिली गर्भपातास परवानगी; दांपत्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:15 AM2021-08-13T04:15:15+5:302021-08-13T04:15:15+5:30

पुणे : वैद्यकीय चाचण्यांमध्ये अनेक व्यंग असल्याचे लक्षात आल्याने, तसेच जन्मानंतर बालकावर शल्यचिकित्सेद्वारे देखील सुधारणा होण्याची शक्यता धूसर ...

Abortion allowed by the High Court due to several anomalies; Comfort to the couple | अनेक व्यंगांमुळे उच्च न्यायालयाने दिली गर्भपातास परवानगी; दांपत्यांना दिलासा

अनेक व्यंगांमुळे उच्च न्यायालयाने दिली गर्भपातास परवानगी; दांपत्यांना दिलासा

Next

पुणे : वैद्यकीय चाचण्यांमध्ये अनेक व्यंग असल्याचे लक्षात आल्याने, तसेच जन्मानंतर बालकावर शल्यचिकित्सेद्वारे देखील सुधारणा होण्याची शक्यता धूसर असल्याने गर्भपात करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे. गर्भपातास परवानगी मिळावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असता, न्यायालयाने गर्भपातास परवानगी दिली.

मुंबई उच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. दोन्हीही प्रकरणांत बालकाच्या पाठीच्या कण्यात व्यंग, हृदयाला असलेले छिद्र, मेंदूची अपुरी वाढ, डोक्याच्या आकाराची अवाजवी वाढ इत्यादी अनेक व्यंगे होती. गर्भधारणेचा कालावधी लक्षात घेतल्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड. तेजस दंडे व अँड. भरत गढवी यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षातर्फे के. आर. कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर दोन्ही विवाहित महिलांचा पुण्यातील ससून रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत संबंधित महिलांना आवश्यक सुविधा रुग्णालयात पुरविण्यात आल्या. ससूनचे अधिष्ठता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली.

----------------------------------------------

Web Title: Abortion allowed by the High Court due to several anomalies; Comfort to the couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.