गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने झाला गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:09 AM2021-03-28T04:09:33+5:302021-03-28T04:09:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उसाची गाडी का लावतो, असे म्हणून मारहाण करून महिलेच्या गर्भपाताला जबाबदार ठरलेल्या पितापुत्राविरुद्ध ...

The abortion was caused by kicking a pregnant woman in the abdomen | गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने झाला गर्भपात

गर्भवती महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने झाला गर्भपात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उसाची गाडी का लावतो, असे म्हणून मारहाण करून महिलेच्या गर्भपाताला जबाबदार ठरलेल्या पितापुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक केली आहे.

जयेश ऊर्फ जित अनिरुद्ध कुलकर्णी (वय ३६, रा. गणेश कुंज सोसायटी, रामबाग कॉलनी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे वडील अनिरुद्ध उद्धव कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी, कोथरुडमधील रामबाग कॉलनीमधील गणेश कुंज सोसायटीच्या सार्वजनिक रस्त्यावर एका कुटुंबाने उसाच्या लाकडी चरकातून रस काढण्याची गाडी लावली होती. या गाडीमुळे त्रास होतो, असे रहिवाशांचे म्हणणे होते. १७ फेब्रुवारी रोजी जयेश व अनिरुद्ध कुलकर्णी या पिता पुत्रांनी उसाची गाडी का लावतो, असे म्हणून संतोष भोसले यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. यावेळी त्यांची पत्नी मनीषा या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असताना या दोघांनी त्यांच्या पोटावर लाथ मारली. त्यानंतर भोसले यांनी त्यांच्या पत्नीला ससून रुग्णालयात नेले असता तेथे त्यांचा गर्भपात झाल्याचे आढळून आले. महिलेचा गर्भपातासारखा प्रकार घडल्यानंतरही कोथरुड पोलिसांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार करुन रहिवाशांच्या कृत्याचे समर्थन केले. या दाम्पत्यानेच मारहाण केल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर मेधा कुलकर्णी, अनिता तलाठी व कुलकर्णी पितापुत्र या चौघांनी १९ मार्च रोजी येऊन तक्रार अर्ज मागे घे, असे सांगून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. येथे उसाची गाडी लावायची नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार केली होती. त्यावरुन कोथरूड पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास केल्यानंतर शुक्रवारी रात्री कोथरूड पोलिसांनी गर्भपात घडवून आणणे व मारहाण केल्याबद्दल पितापुत्रांवर गुन्हा दाखल केला. जयेश कुलकर्णी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहे.

Web Title: The abortion was caused by kicking a pregnant woman in the abdomen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.