सुमारे २५ टक्के दुकाने कायमची बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:48+5:302021-05-28T04:09:48+5:30

दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चालू लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत सुमारे ७५ हजार कोटी रुपयांचा व्यापार ठप्प झाला. त्यामुळे ...

About 25% of shops are permanently closed | सुमारे २५ टक्के दुकाने कायमची बंद

सुमारे २५ टक्के दुकाने कायमची बंद

Next

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चालू लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत सुमारे ७५ हजार कोटी रुपयांचा व्यापार ठप्प झाला. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचा सुमारे ९ हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. २५ टक्के दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने केली आहे.

ʻलोकमतʼने शहरातील विविध भागातील व्यवसाय स्थितीबाबत बुधवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी ʻलोकमतʼला सांगितले की, गेल्या पावणे दोन महिन्यात ठप्प झालेला व्यवसाय पाहता आता लॉकडाऊनला मुदतवाढ दिल्यास व्यापाऱ्यांचा कडेलोटच होईल.

रांका म्हणाले की, गतवर्षी पहिल्या लॉकडाऊनचाही मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला होता. बँकांनी, कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ दिली मात्र व्याजमाफी दिली नाही. व्यवसाय बंद असताना भाडे भरावे लागले. वीजबिलातही कोणतीही सवलत मिळाली नाही. दुसरीकडे नोकरवर्गाला मात्र व्यापाऱ्यांना सांभाळावे लागले. प्रसंगी व्यापाऱ्यांनी दागिने विकले, बचतीची रक्कम वापरली. लॉकडाऊन उठवल्यानंतरही नागरीक घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याने व्यवसाय काही पूर्वपदावर आला नाही. दिवाळीच्या काळात थोडा फार दिलासा मिळाला मात्र तो पुरेसा नव्हता.

तशातच, दुसरा लॉकडाऊन आत्ता सुरू आहे. याची वास्तविक गरज नव्हती. हॉटेल व्यावसायिकांबरोबरच छोट्या गाळ्यांमध्ये खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फटका बसला. पार्सल सिस्टीमला मान्यता मात्र त्यांना शटर उघडण्याची परवानगी नाही. कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली मात्र कामगार गावाकडे निघून गेलेले आणि कच्चा माल मिळेना, अशा कात्रीत कारखानदार अडकले. मंडप, केटरर्स, मंगल कार्यालये यांनाही मोठा फटका बसला आहे. पंचतारांकीत हॉटेल सुरू आहेत मात्र तेथे १० टक्केही ग्राहक नाहीत.

चौकट

...तर ५० टक्के दुकाने बंद

शहरातील तब्बल २५ टक्के दुकाने बंद पडली आहेत. भाडेपट्ट्याचे दर कमी करण्यास जागा मालकांचा नकार, भांडवलाची कमतरता, बंद काळातील भाडेपट्ट्यात सवलत न मिळणे आदींमुळे दुकानदार व्यवसाय बंद करीत आहेत. लॉकडाऊनची मुदत वाढवल्यास दुकाने बंद होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर जाऊ शकते.

चौकट

...असा बुडतोय सरकारचा महसूल

१) दोन महिन्यांत व्यापार बुडाला : सुमारे ७५००० कोटी रुपयांचा.

२) सरासरी १० % जीएसटी : ७५०० कोटी रुपये

........................................

१) अंदाजे नफा ५ % = ३७५० कोटी रुपये

त्यावर ३३ % आयकर = १२५० कोटी रुपये

* सरकारचा बुडलेला महसूल = सुमारे ८ हजार ७५० कोटी रुपये.

चौकट

“आगाऊ कर भरणा करण्याची मुदत अद्याप बाकी असल्याने नेमक्या किती रुपयांचा महसूल बुडेल, हे आज सांगता येणार नाही. मात्र महसुलात या तिमाहीत घट येणार हे स्पष्ट आहे,” असे केंद्रीय जीएसटी आणि आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: About 25% of shops are permanently closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.