भोर व वेल्हे तालुक्यातील प्रशासकीय इमारतीसाठी सुमारे ३१.९८ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:28 AM2020-12-13T04:28:08+5:302020-12-13T04:28:08+5:30
भोर वेल्हे तालुक्यात जागेमुळे प्रशासकीय इमारत रखडली होती यामुळे कार्यालय विखुरलेल्या आवस्थेत असल्यामुळे लोकांना विविध कामासाठी अडचणी येत होत्या ...
भोर वेल्हे तालुक्यात जागेमुळे प्रशासकीय इमारत रखडली होती यामुळे कार्यालय विखुरलेल्या आवस्थेत असल्यामुळे लोकांना विविध कामासाठी अडचणी येत होत्या त्यामुळे प्रशासकीय इमारत व्हावी म्हणून मागणी वाढत होती. यामुळे
आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नाने भोर आणी वेल्हे तालुक्यातील प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली असुन भोसाठी १५.९९ कोटी आणी वेल्हेसाठी १५.९९ कोटी असा एकुण ३१.९८ कोटी रु निधी मंजुर करण्यात आला आहे.
नवीन वास्तूची निर्मिती लवकरच करण्यात येणार असुन भोर व वेल्हा या ठिकाणी इमारतीसाठी जागेची पाहणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली यावेळी उपविभागीय अधिकारी
राजेंद्रकुमार जाधव,तहसीलदार अजित पाटील,शिवाजी शिंदे वास्तुशास्त्र तज्ञ चेतन आक्रे,समीर बी.यादव,कार्यकारी अभियांता श्री भोसले,उपअभियंता श्री वागज, उपभियांता एस. एस.सपकाळ,दिनकर धारपळे,अमोल नलावडे,सीमा राऊत नाना राऊत,कार्यकर्ते उपस्थित होते.
--
भोर व वेल्हा तालुक्याकील सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच इमारतीत करण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयंत्न करत होतो, भोर व वेल्हे तालुक्यातील प्रशासकीय इमारतीसाठी प्रत्येकी रु.१५.९९ कोटी निधी मंजूर झाल्यामुळे सर्व कार्यालये एकाच ठिकाणी होतील आणी लोकांची कामे त्वरीत होणार आहेत जागेची पाहणी केली असून आर्किटेक प्लँन तयार असून लवकरच कामाला सुरवात करण्यात येणार आहे.
संग्राम थोपटे ,
आमदार