पीएमपीच्या सहा हजारांहून अधिक फेऱ्या रद्द; उत्पन्नाचा नीच्चांक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 09:09 PM2020-03-17T21:09:00+5:302020-03-17T21:10:01+5:30

सुमारे ५७५ बस पुढील पंधरा दिवस मार्गावर येणार नाहीत.

About Six thousand round cancelled due to corona | पीएमपीच्या सहा हजारांहून अधिक फेऱ्या रद्द; उत्पन्नाचा नीच्चांक 

पीएमपीच्या सहा हजारांहून अधिक फेऱ्या रद्द; उत्पन्नाचा नीच्चांक 

Next
ठळक मुद्देकोरोना विषाणूचा प्रभाव वाढू लागल्याने शहरातील शाळा व महाविद्यालये बंद ब्रेकडाऊन किंवा बस उपलब्ध न झाल्याने दररोज ३ ते ४ हजार फेऱ्या रद्द मागील काही दिवसांपासून पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात मोठी घट

पुणे : शहरातील गर्दी कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसच्या दैनंदिन फेऱ्या सुमारे सहा हजारांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून (दि. १७) केवळ गर्दीच्या वेळी सुमारे ११०० बसच मार्गावर असतील. सुमारे ५७५ बस पुढील पंधरा दिवस मार्गावर येणार नाहीत, अशी माहिती पीएमपी अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रभाव वाढू लागल्याने शहरातील शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. तसेच अनेक खासगी कंपन्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली आहे. बाजारपेठाही तीन दिवस बंद केल्याने कामगारही घरीच आहेत. त्याचा फटका पीएमपी बससेवेला बसू लागला आहे. त्यामुळे प्रवासीसंख्या घटली आहे. त्यातच आता जिल्हा प्रशासनाने बसफेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पीएमपीच्या १५५० ते १६५० बसच्या माध्यमातून दररोज सुमारे २१ हजार फेऱ्या होतात. ब्रेकडाऊन किंवा बस उपलब्ध न झाल्याने दररोज ३ ते ४ हजार फेऱ्या रद्द होतात. आता कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी केवळ ११०५ बस मार्गावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रद्द फेऱ्यांचा आकडा ६ ते ७ हजारांवर जाणार आहे. 
सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी बससंख्येत फारसा बदल केला जाणार नाही. दुपारी अनेक मार्गांवर गर्दी कमी असते. या मार्गांवरील फेºया रद्द करण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ न देता नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी दिली.
--
उत्पन्नाचा नीचांक
मागील काही दिवसांपासून पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात मोठी घट झाली आहे. प्रवासी संख्येत मोठी घट झाल्याने मागील तीन-चार दिवसांत उत्पन्न ८० ते ९० लाखांपर्यंत खाली आले आहे. आणखी फेºया रद्द होणार असल्याने उत्पन्नाचा नीच्चांक होणार आहे. कमी बस मार्गावर येणार असल्याने त्याचा फटका रोजंदारीवर काम करणाºया चालक, वाहक व इतर कर्मचाºयांना बसणार आहे. त्यांना कामच मिळणार नाही, असे अधिकाºयांनी सांगितले. 

Web Title: About Six thousand round cancelled due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.