फरार सराईत गुंड रुपेश मारणेला साथीदारासह अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई
By विवेक भुसे | Published: November 4, 2022 03:13 AM2022-11-04T03:13:08+5:302022-11-04T03:15:03+5:30
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पुणे : कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या टोळीतील फरार गुंड रुपेश मारणे याला साथीदारासह पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुळशी परिसरातून अटक केली आहे. रुपेश मारणे आणि संतोष शेलार, अशी अटक केलेल्या दोघा फरार गुंडाची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह १५ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली. गज्या मारणे याला अटक केली असली तरी रुपेश मारणे व त्याचे साथीदार फरार होते.
एका व्यावसायिकाने बांधकाम व्यवसायासाठी १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात २ कोटी ३० लाख रुपये परत दिले होते. तरीही आणखी ६५ लाखांची मागणी करुन या व्यावसायिकाला धमकाविले जात होते. याप्रकरणी रुपेश मारणेसह चौघांवर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.