दोन वर्षांपासून फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:09 AM2021-05-20T04:09:47+5:302021-05-20T04:09:47+5:30

दोन वर्षांपासून फरार असलेले मोक्कातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बारामती : गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या ...

Absconding for two years | दोन वर्षांपासून फरार

दोन वर्षांपासून फरार

googlenewsNext

दोन वर्षांपासून फरार

असलेले मोक्कातील आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बारामती : गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींना पोलिसांनी सापळा रचत कुरकुंभ (ता. दौंड) येथे मंगळवारी (दि. १८) ताब्यात घेऊन इंदापूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०२० रोजी सराटी (ता. इंदापूर) येथे फिर्यादी आदर्श गायकवाड व त्यांचा मित्र अक्षय चंदनशिवे असे इंदापूर-अकलूज रोडने अकलूज बाजूकडे निघाले होते. या वेळी ३ दुचाकीवर ७ आरोपी आले. त्यांनी अक्षय यास तू आदर्श सोबत का फिरत असतोस, तुला लय मस्ती आली आहे, तुला संपवतोच, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच आरोपींनी लोखंडी पाईप, टॉमी, वेळूची काठी, लाकडी दांडके याने मारहाण करून अक्षय राजेंद्र चंदनशिवे (वय २२ रा. अकलूज ) याचा खून केला होता. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये एकूण ५ आरोपींनी अटक केली होती. यातील २ आरोपी फरार होते. तसेच हा गुन्हा संवेदशील व आरोपीचे पूर्व रेकॉर्ड गुन्हेगारी स्वरूपाचे आसल्यामुळे सदरचा गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९चे कलम लावण्यात आले होते.

मंगळवारी पुणे-सोलापूर हाय-वेवर पेट्रोलिंग सुरू होते. या वेळी पोलिसांना गोपनीय बतमीदारांमार्फत माहिती मिळाली. संबंधित गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश ऊर्फ आण्णा राजेंद्र कोळेकर (वय २७ रा. व्यंकटनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर), सोमनाथ बुरुदेव रूपनवर (वय २८ रा. व्यकटनगर, अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर) हे कुरकुंभ येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर समजले. त्यानुसार पोलिसांनी ठिकाणी सापळा लावून कोळेकर आणि रूपनवर या आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून इंदापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, दत्ता तांबे, पोलीस नाईक विजय कांचन, राजू मोमीन, अभिजित एकशिगे पो. कॉ. अमोल शेडगे, मंगेश भगत, धीरज जाधव, बाळासाहेब खडके, दगडू वीरकर, महिला पोलीस अंमलदार सुजाता कदम, पूनम गुंड यांचे पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेले मोक्कातील आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

१९०५२०२१ बारामती—०१

Web Title: Absconding for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.