आळंदी शहरासाठी मुबलक लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:01+5:302021-07-18T04:08:01+5:30
आळंदी शहराची लोकसंख्या ५० हजारांच्या पुढे असून सुमारे २२ हजार मतदार आहेत. सध्या मात्र आळंदीसाठी अवघे १०० ते २०० ...
आळंदी शहराची लोकसंख्या ५० हजारांच्या पुढे असून सुमारे २२ हजार मतदार आहेत. सध्या मात्र आळंदीसाठी अवघे १०० ते २०० कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात येत आहेत. यांमुळे लसीकरणाचा वेग मंदावला असून असंख्य ज्येष्ठ नागरिक पहिल्या लसीकरणापासून वंचित आहेत. तर काहींचा पहिला डोस घेऊन १०० दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु मुबलक लस मिळत नसल्याने संबंधित दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत.
या पार्श्वभूमीवर आळंदी विकास युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मोहिते-पाटील व खासदार डॉ. कोल्हे यांची भेट घेऊन लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी ज्येष्ठ शिवसेना नेते आनंदराव मुंगसे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अरिफभाई शेख, आळंदी विकास युवा मंचचे अध्यक्ष संदीप नाईकरे, मनसेचे प्रसाद बोराटे, दत्तात्रय तापकीर आदी उपस्थित होते.
दरम्यान पुढील आठवड्यापासून मुबलक लस पुरवठा करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या असून इतर बाबतीत देखील बैठक घेणार असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.
१७ आळंदी
राजगुरूनगर येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना निवेदन देताना नागरिक.