Ujani Dam: उजनीत मुबलक पाणीसाठा; धरणातील यंदाची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्याने जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:46 PM2022-03-28T17:46:54+5:302022-03-28T17:47:12+5:30

पंढरपुर, मंगळवेढा व सोलापुरसह आजुबाजुच्या गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणले जाते

abundant water supply in ujani this year level in the dam is 7% higher than last year | Ujani Dam: उजनीत मुबलक पाणीसाठा; धरणातील यंदाची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्याने जास्त

Ujani Dam: उजनीत मुबलक पाणीसाठा; धरणातील यंदाची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्याने जास्त

Next

इंदापूर : राज्यातील सर्वात मोठ्या व पूणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जिवनदायिनी ठरलेल्या उजणी धरणातील सध्याची पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेत सात टक्क्याने जास्त आहे. सोलापूरला पिण्यासाठीच्या पाण्याचे एक आवर्तन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाले आहे.

तरीही उजणी धरणात अजून ६६.९३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दोन महीने सोलापुरात उष्णता कीतीही वाढली तरीही सोलापुरला पाण्याची कमतरता मात्र भासणार नसल्याची माहीती उजणी धरण पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे यांनी दिली.

 उजणी धरणाचे पाणी पंढरपुर, मंगळवेढा व सोलापुरसह आजुबाजुच्या गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणले जाते. या परिसरामध्ये जवळ जवळ तीस ते चाळीस साखर कारखाने हे उजणीच्या पाण्यावर अवलंबुन आहेत. सध्या उजणी धरणामध्ये ६६.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील सध्याची पाणी पातळी ४९५.२३० मीटर इतकी आहे. धरणात एकुण ३५.८६ टीएमसी एवढा उपयक्त पाणी साठा आहे. सध्या उजणीतुन सिना-माढा बोगदा २२२ क्युसेक, दहीगाव एल- आयएस ८४ क्युसेक, बोगदा १०० क्युसेक, व मुख्य कॅनाल ३०० क्युसेक असा एकुण ७०६ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू असुन चालु वर्षी पाण्याची कमतरता भासणार नाही.

पाण्याचा फायदा पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांना होणार 

उजणी धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी इतकी आहे. चालू हंगामात उजणी धरण परिसर व भीमा खोर्‍यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने उजणी धरण हे पुर्ण क्षमतेने भरले होते. तर धरण परिसरात अवकाळी पावसाचे प्रमाण यावर्षी जास्त झाल्याने उजणीच्या खालच्या भागातील शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणार्‍या पाण्याची कमतरता फारच कमी भासली. त्यामळे यावर्षी चालु हंगामात उजणीतुन शेतीसाठी पाण्याच्या आवर्तनाची मागणी झाली नाही. परिणामी धरणात पाणीसाठा मुबलक शिल्लक राहिल्याने या पाण्याचा फायदा पूणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना व नागरिकांना जास्त होणार आहे.

Web Title: abundant water supply in ujani this year level in the dam is 7% higher than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.