१४ वर्षीय मुलीवर अत्याचार; नराधम २२ वर्षे खडी फोडणार
By नम्रता फडणीस | Published: July 22, 2024 06:03 PM2024-07-22T18:03:02+5:302024-07-22T18:03:42+5:30
आई कामावर गेली की हा नराधम घरात जाऊन मुलीवर अत्याचार करत होता
पुणे: मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे म्हणत चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणा-या तरुणाला न्यायालयाने 22 वर्षे सक्तमुजरी आणि 14 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मुलीच्या पुनर्वसनासाठी देण्यात यावी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मनोधैर्य योजनेअंतर्गत मुलींना योग्य ती मदत करावी, असे आदेशात नमूद आहे. विशेष न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी हा निकाल दिला. अमोल लक्ष्मण वाघमारे (वय 30, रा. थेरगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान फेब्रुवारी दरम्यान थेरगाव येथे हा प्रकार घडला. फिर्यादी या धुणीभांड्याची कामे करतात. कामानिमित्त त्या घराबाहेर पडल्या असता वाघमारे हा त्यांच्या घरी येत. त्याने सुरुवातीला मुलीला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला. 2019 ते 2000 फेब्रुवारी 2020 दरम्यान हा सर्व प्रकार सुरू होता. दरम्यान फिर्यादी यांना त्यांच्या शेजारी राहत असलेल्या एका महिलेने सांगितले की, तुम्ही कामाला गेल्यानंतर वाघमारे हा तुमच्या घरात जातो. याबाबत फिर्यादी यांनी मुलीकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर फिर्यादी यांनी वाघमारे याच्या विरोधात फिर्याद दाखल गेली होती. या गुन्ह्याचा तपास तत्नकालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांनी केला. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुप्रिया मोरे- देसाई यांनी पाहिले. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवीकुमार नाळे यांनी प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी कोर्ट भैरवी कर्मचारी डी .एस.पांडुळे यांनी मदत केली.