नराधम सावत्र बापाकडूनच चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार ; बापाला अटक
By नम्रता फडणीस | Updated: June 15, 2024 22:12 IST2024-06-15T22:12:14+5:302024-06-15T22:12:23+5:30
सुनील राजू चौहान (वय २२, रा. अप्पर इंदिरनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुलगी सातत्याने रडायची. तिच्या हातावर चटके दिल्याचे व्रण दिसत होते.

नराधम सावत्र बापाकडूनच चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार ; बापाला अटक
पुणे : नराधम सावत्र बापाचं वैरी निघाला. चार वर्षांच्या बालिकेला क्रूरपणे वागणूक देत तिच्यावर लैगिंक अत्याचार करणा-या बापाला भारती
विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. शिक्षिकेला या बालिकेने झालेला प्रकार सांगितल्याने ही बाब समोर आली आहे. दि. ५ ते १४ जून दरम्यान ही घटना
घडली.
सुनील राजू चौहान (वय २२, रा. अप्पर इंदिरनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुलगी सातत्याने रडायची. तिच्या हातावर चटके दिल्याचे व्रण दिसत होते. शिक्षिकेने मुलीला विचारले तिने रडत रडतच सर्व प्रकार सांगितला. आईला देखील मुलीने सांगितले होते. सुरुवातीला आई काहीशी घाबरली होती. मात्र आईनेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी सुनील यांचे प्रेमसंबंध होते. दोघेजण एकत्र राहत होते. आरोपी चौहान आणि बालिकेची आई बांधकाम मजूर आहेत.
आरोपीने महिलेच्या चार वर्षांच्या बालिकेशी अश्लील कृत्य केले. बालिकेला चाकू गरम करून चटके दिले. बालिकेला क्रुरतेची वागणूक देऊन तिच्यावर
अत्याचार केले असे आईने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी तपास करत आहेत.