Pune Crime: जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 10:12 IST2023-06-08T10:10:54+5:302023-06-08T10:12:08+5:30
चंदननगर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे...

Pune Crime: जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पुणे : माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु प्रेम केले नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन,अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. त्यातून ही १६ वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. चंदननगर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
किशन थोराजी पतंगे (वय २५,रा. वडगाव शेरी) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार डिसेबर २०२२ व जानेवारी २०२३ दरम्यान घडला. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी व आरोपी किशन पतंगे याच्यात ओळख होती. किशन याने तिला माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तु जर माझ्याशी प्रेम केले नाही तर मी माझे जीवाचे बरे वाईट करील, असे म्हणून तिला भीती दाखविली. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध केले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपनिरीक्षक मुळुके तपास करीत आहेत.