Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: April 22, 2023 05:33 PM2023-04-22T17:33:04+5:302023-04-22T17:36:33+5:30
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला...
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी त्याने शारीरिक संबंध ठेवले. तिचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लग्नाचे विचारल्यावर जीवे मारण्याची धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चौघांवर अनुसूचित जामी व अनु. जमातीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दयानंद निळाेबा फंड, विश्वजीत दयानंद फंड (रा. शिरुर) यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत धायरी येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी व दयानंद फंड हे ओळखीचे आहेत. दयानंद याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी फिर्यादी यांचे नग्न फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
विश्वजीत याने जीवे मारण्याची धमकी देऊन इतरांनी जातिवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याने या महिलेने सुरुवातीला शिरुर एमआयडीसीकडे तक्रार केली होती. तेथून ती सिंहगड रोडला वर्ग करण्यात आली असून पोलिस निरीक्षक राजूरकर तपास करीत आहेत.