पिंपरी : अमानुष! जन्मदात्या पित्यासह शिक्षिकेच्या पतीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाच जणांना अटक

By नारायण बडगुजर | Published: July 6, 2024 09:11 PM2024-07-06T21:11:05+5:302024-07-06T21:11:08+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ एप्रिल ते २९ जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली. 

Abuse of minor girl by teacher's husband with biological father | पिंपरी : अमानुष! जन्मदात्या पित्यासह शिक्षिकेच्या पतीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाच जणांना अटक

पिंपरी : अमानुष! जन्मदात्या पित्यासह शिक्षिकेच्या पतीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाच जणांना अटक

पिंपरी : सोशल मीडियावरील व्हिडीओप्रमाणे शरीरसंबंध करू, असे म्हणून एका नराधमाने १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या शिक्षिकेच्या पतीने व आईच्या मैत्रिणीच्या पतीने व दिराने तसेच जन्मदात्या पित्याने देखील मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी नराधम पित्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ एप्रिल ते २९ जून २०२४ या कालावधीत ही घटना घडली. 

याप्रकरणी पीडित १३ वर्षीय मुलीने गुरुवारी (दि. ५) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. समाधान लवटे (वय ४०,), प्रताप प्रमोद धायतडे, नितीन हराळे (३२, तिघे रा. चिखली), सागर हराळे (२०, रा. मोहननगर, आकुर्डी) आणि पीडीत मुलीच्या पिता यांच्या विरोधात पोलिसांनी भा.दं.व.ि कलम ३७६ (२) (आय), ३७६ (सी), ३५४, ३५४ (ए), ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२, २१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या पित्यासह समाधान लवटे, प्रताप धायतडे, सागर हराळे, नितीन हराळे यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही युट्युबवर व्हिडीओ पाहत होती. त्यावेळी तेथे आलेला समाधान लवटे म्हणाला, मी पण या व्हिडीओप्रमाणे तुझ्यासोबत करतो. त्यानंतर पीडित मुलीला त्याच्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराबाबत पीडित मुलीने तिच्या वडिलांना सांगितले. याबाबत कोणाला काही सांगू नको, आपली इज्जत खराब होईल, असे तिच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी आजारी असल्याने घरात झोपलेली असताना तिच्या वडिलांनी जबरदस्ती करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी मुलीने विरोध केला असता त्याने तिला धमकी दिली. कोणास काही सांगितले तर तुझे तुकडे करेन, असे धमकावले. त्यामुळे पीडित मुलीने कोणाला काही सांगितले नाही. 

दरम्यान, पीडित मुलगी ट्युशनसाठी तिच्या शिक्षिकेच्या घरी गेली. त्यावेळी घरात कोणी नसताना शिक्षिकेच्या पतीने देखील गैरकृत्य करून पीडित मुलीवर जबरदस्ती केली. त्यानंतर १९ मे रोजी पीडित मुलीच्या आईच्या मैत्रिणीच्या दिराने देखील गैरकृत्य केले. तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे बोलून जबरदस्ती केली. त्यानंतर २ जून रोजी पीडित मुलगी आईच्या मैत्रिणीच्या घरी गेली असता मैत्रिणीच्या पतीने गैरकृत्य केले. त्यानंतर २९ जून रोजी रात्री तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केले. 

मुलीने स्वत: गाठले पोलिस ठाणे

अल्पवयीन मुलगी शुक्रवारी (दि. ५) नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र, जन्मदात्या पित्याकडून तसेच परिचयातील व्यक्तींकडून सुरू असलेले अत्याचार, जबरदस्ती सहन न झाल्याने मुलीने शाळेतून थेट चिखली पोलिस ठाणे गाठले. ती स्वत: एकटीच पोलिस ठाण्यात गेली. त्यानंतर पोलिसांना तिने हकिकत सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तिच्या पित्यासह इतर संशयितांनाही अटक केली.

Web Title: Abuse of minor girl by teacher's husband with biological father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.