Pune Crime: रुम बघायला बोलावून महिलेवर बळजबरीने अत्याचार, आरोपीला सशर्त जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 01:53 PM2023-12-23T13:53:45+5:302023-12-23T13:55:01+5:30
रूम दाखविण्याच्या बहाण्याने तिला बोलावले आणि स्वतःच्या रूमवर नेऊन अत्याचार केला असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे...
पुणे : घरी बोलावून बळजबरीने अत्याचार केल्या प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. कर्णिक यांनी आरोपीला सशर्त जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. संतोष संभाजी केंद्रे असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे. ही घटना विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत घडली होती. पीडित महिला ही लोहगाव परिसरामध्ये रूम शोधत होती. या महिलेने ओएलक्स ॲप डाऊनलोड करून त्यावर रूम सर्च केली. त्यावर संतोष केंद्रे याचा नंबर मिळाला. त्यावर कॉल केला तर आरोपीने सांगितले तुम्हाला रूम बघून देतो तुमचा व्हाॅट्सॲप नंबर द्या. त्याने रूम दाखविण्याच्या बहाण्याने तिला बोलावले आणि स्वतःच्या रूमवर नेऊन अत्याचार केला असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. आरोपीने सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज केला होता. पण सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या नंतर आरोपीने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपीच्या वतीने ॲड आशिष सातपुते, ॲड. नीलेश वाघमोडे यांनी काम पाहिले.