सोशल मीडियाद्वारे मैत्री करुन तरुणीवर अत्याचार

By नितीश गोवंडे | Published: February 7, 2024 03:06 PM2024-02-07T15:06:12+5:302024-02-07T15:06:49+5:30

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार केली

Abuse of young woman by making friends through social media | सोशल मीडियाद्वारे मैत्री करुन तरुणीवर अत्याचार

सोशल मीडियाद्वारे मैत्री करुन तरुणीवर अत्याचार

पुणे : सोशल मीडियाद्वारे मैत्री करून मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका तरुणावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१६ ते २८ जानेवारी या कालावधीत वानवडी, लोणावळा, वडकी, हडपसर व कोरेगाव पार्क येथे घडला आहे.

याबाबत घोरपडी गाव येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. ६) मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून चेतन चंदर मुट्टल (२२, रा. मुत्तलवाडी, पाटण, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा येथील चेतन मुट्टल याने पुण्यातील घोरपडी गावात राहणाऱ्या २० वर्षीय मुलीसोबत २०१६ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बिनवडे करत आहेत.

Read in English

Web Title: Abuse of young woman by making friends through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.