Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; डॉक्टरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 11:24 AM2023-02-25T11:24:48+5:302023-02-25T11:25:02+5:30

ही घटना सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडली...

Abuse of young women by luring them into marriage; A case has been registered against the doctor | Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; डॉक्टरवर गुन्हा दाखल

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; डॉक्टरवर गुन्हा दाखल

googlenewsNext

धनकवडी (पुणे) : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या व नंतर ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित डॉक्टरने तरुणीकडून साठ हजार रुपये उसने घेत तिची फसवणूक केली आहे. ही घटना सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडली.

डॉ. अंकुश गुंड (रा. गणेश व्हिला, आंबेगाव) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वडील आजारी असताना वडिलांचे रिपोर्ट दाखविण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली असता दोघांची ओळख झाली. या ओळखीतून फिर्यादी तरुणी आणि डॉ. अंकुश गुंड यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर तरुणी गर्भवती असताना डॉक्टरने तिला औषधी गोळ्या खायला देऊन गर्भपात केला. तिचा मोबाइल आणि साठ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. त्यानंतर तरुणी पुन्हा गर्भवती असताना डॉ. अंकुश गुंडने तिला मारहाण केली. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली.

Web Title: Abuse of young women by luring them into marriage; A case has been registered against the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.