रुग्णाच्या मृत्युनंतर डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण; बारामती शहरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 08:41 PM2020-09-11T20:41:45+5:302020-09-11T20:44:41+5:30

एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार

Abusing and beating staff, including doctors, after the death of a patient; Incidents in Baramati city | रुग्णाच्या मृत्युनंतर डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण; बारामती शहरातील प्रकार

रुग्णाच्या मृत्युनंतर डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण; बारामती शहरातील प्रकार

googlenewsNext
ठळक मुद्देबारामती शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखलपोलीस अधिकारी, कर्मचारी तासाला कोविड सेंटरला भेट देणार

बारामती : बारामती शहरात कोविड रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यु झाल्यानंतर डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.गुरुवारी(दि.१०) रात्री १०.३० च्या सुमारास हा प्रकार घडला.त्यानंतर या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रक़रणी भुलतज्ञ डॉ. सुजित दामोदर अडसुळ (रा.बारामती रेवंत अपार्टमेंट १ विंग ,तावरे बंगला ता.बारामती जि.पुणे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार आरोपी शिवाजी जाधव (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री बारामती आरोग्य हॉस्पिटल येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला.त्यानंतर शिवाजी जाधव या इसमाने डॉ. राहुल जाधव यांचे हॉस्पिटल कंन्सल्टींगरूम मध्ये कोणाचीही परवानगी न घेत प्रवेश केला. रुग्ण कोरोनामुळे कसा मयत झाला,अशी विचारणा करीत दोघी महिला परिचारिकांकडे पाहत हातवारे केले,अर्वाच्च विधाने केली.तसेच अश्लिल भाषेत बोलुन डॉ. अडसुळ यांना धक्काबुकी व हाताने मारहाण केली. सर्व हॉस्पिटलच्या स्टाफला शिवीगाळ करून तुमचेकडे बघुन घेतो. तुम्हाला बाहेर आल्यानंतर जिवंत सोडणार नाही,असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान,याप्रकरणी शहर,तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत या घटनेचा निषेध केला.याबाबत रात्री उशीरापर्यंत शहरातील मेडीकोज गिल्डच्या सभागृहात बैठक सुरु होती.
—————————
...पोलीस अधिकारी, कर्मचारी तासाला कोविड सेंटरला भेट देणार
शहरातील कोविड सेंटर मध्ये डॉक्टर स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत. त्यांनाशासन पोलीस प्रशासन संरक्षण देणार कोणत्याही हॉस्पिटल व डॉक्टर यांच्यावर असा प्रकार झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल. शहरात १६ खाजगीहॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रत्येक तासाला भेट देणार आहेत. डॉक्टरांनी आपले कर्तव्य पारपडावे , घाबरू नये, पोलिसांशी संपर्क साधावा.
औदुंबर पाटील, बारामती शहर पोलीस निरीक्षक

Web Title: Abusing and beating staff, including doctors, after the death of a patient; Incidents in Baramati city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.