शहरातील लसीकरणाच्या मोहिमेला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:05+5:302021-06-28T04:09:05+5:30
पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने गेल्या आठवड्यात मोठा वेग घेतला असून, दिवसाकाठी खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये साधारणत: १६ ते ...
पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने गेल्या आठवड्यात मोठा वेग घेतला असून, दिवसाकाठी खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये साधारणत: १६ ते १७ हजार जणांना लस दिली जात आहे़ शुक्रवार, दि. २५ जूनपर्यंत शहरातील १५ लाख १ हजार ३३९ जणांना लस देण्यात आली आहे़ यामध्ये ११ लाख ९० हजार ४२६ जणांना पहिला डोस, तर ३ लाख १० हजार ९१३ जणांचे लसीचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत़
शहरात सर्वांत शेवटी सुरू झालेल्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाने मात्र या दरम्यान चांगलाच वेग घेतला असून, शहरात या वर्गातील सर्वाधिक म्हणजे ३ लाख ७५ हजार २५ जणांचे लसीकरण झाले आहे़ या सर्वांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे़ तर ६० वर्षांपुढील ३ लाख ५६ हजार ६१४ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून, यापैकी १ लाख ५१ हजार ३६२ जणांचे लसीचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत़
--------------------------------