वालचंदनगर परिसरात गहू काढणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:09 AM2021-03-28T04:09:35+5:302021-03-28T04:09:35+5:30

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कळंब, रणगाव, चिखली, वालचंदनगर आदी परिसरातील शेतकऱ्यांनी गहू मळणी यंत्राद्वारे गहू काढण्यास सुरुवात केली आहे, ...

Accelerate wheat harvesting in Walchandnagar area | वालचंदनगर परिसरात गहू काढणीला वेग

वालचंदनगर परिसरात गहू काढणीला वेग

Next

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कळंब, रणगाव, चिखली, वालचंदनगर आदी परिसरातील शेतकऱ्यांनी गहू मळणी यंत्राद्वारे गहू काढण्यास सुरुवात केली आहे, सध्या गहू काढण्यास मजुरांची कमालीची कमतरता भासत असून, मजूर चढ्यादराने मजुरीमागत असल्याने शेतकऱ्यांनी पर्याय निवडत गहू मळणी यंत्राकडे मोर्चा वळवला आहे.

या मशिनी आंध्र प्रदेश, कर्नाटक भागातून येत असतात. प्रतिएकर गहू काढणीसाठी १ महिन्यापूर्वी २८०० रुपये दर होता मात्र गहू मळणी यंत्रे मुबलक झाल्यामुळे सध्या तो प्रति एकर १६०० ते १८०० रुपये झाला आहे. गहू काढणे, पेंढ्या बांधणे, व मशीनच्या साहाय्याने गहू मळणी करणे आदी कामांना खूप वेळ लागत असे मात्र सध्याच्या गहू मळणी यंत्राने काही तासांच्या आत शेतीमधील शेतमाल घरी आणला जात आहे. पैसा आणि वेळ या दोन्हीही बचत होत असल्याने बहुतांशी शेतकºयांनी गहू मळणी यंत्राद्वारे गहू काढण्याचा उपक्रम राबवला आहे.

————————————————————

फोटो ओळी : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कळंब परिसरात गहू मळणी यंत्राद्वारे गहू काढण्याच्या कामास वेग आला आहे.

२७०३२०२१-बारामती-०४

——————————————

Web Title: Accelerate wheat harvesting in Walchandnagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.