द्रुतगतीवर अपघात; सात जण जखमी
By admin | Published: March 31, 2017 02:56 AM2017-03-31T02:56:48+5:302017-03-31T02:56:48+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने पनवेल येथे एका समारंभासाठी निघालेल्या पिकअप जीपला अमृतांजन पुलाच्या खाली
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने पनवेल येथे एका समारंभासाठी निघालेल्या पिकअप जीपला अमृतांजन पुलाच्या खाली झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले.
गवाजी तवाजी मेदगे, लक्ष्मण खंडू सावंत, रंगनाथ तुकाराम मेदगे, लक्ष्मण रामभाऊ आढाव, कचरु धोंडू आढाव, शंकर बोरकर, विश्वनाथ मेदगे (सर्व रा. औदर ता. खेड) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. राजगुरुनगर येथील वारकरी मंडळाचे १८ जण पिकअप जीप ( एमएच ४६, ५२९०) मधून पनवेल येथे एका पूजा समारंभासाठी चालले असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच खोपोली येथील ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या ग्रुपचे सदस्य गुरुनाथ साठेलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी, तसेच बोरघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचाराकरिता खोपोलीतील दवाखान्यात दाखल केले.(वार्ताहर)
द्रुतगती मार्गावर मागील २४ तासांत पनवेल ते खंडाळा घाट दरम्यान तीन अपघात झाले. या तीनही ठिकाणी अपघातग्रस्तांच्या मदतीला या ग्रुपच्या सदस्यांनी आपत्कालीन सेवा देत सामाजिक बांधिलकी जपली.