द्रुतगतीवर अपघातात ट्रकचालक ठार
By admin | Published: April 2, 2017 02:52 AM2017-04-02T02:52:27+5:302017-04-02T02:52:27+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने ट्रक चालकाचा मृत्यू झाला.कामशेत पोलिसांनी दिलेल्या
कामशेत : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने ट्रक चालकाचा मृत्यू झाला.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. १ रोजी सकाळी ५.३० च्या सुमारास कोल्डमन लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड कंपनीचा ट्रक क्र. के ए ५३ बी ७३७९ या वरील चालक संजय कुमार यादव (वय २९ वर्षे, रा. सिद्धनाथ मिश्रा चाळ, घरतेन पाडा, नं. १ एस पी रोड, दहिसर पूर्व) हा भिवंडी मधून आइस्क्रीम बॉक्स भरून कोल्हापूरला द्रुतगती महामार्गाने मुंबईवरून निघाला असताना मौजे बऊरच्या (मावळ ) हद्दीत कामशेत बोगद्याच्या जवळ ट्रकच्या पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला पाठीमागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला.
आयआरबी कंपनीच्या कर्मचारी व पोलिसांनी त्याला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला, असे डॉक्टरानी सांगितले. महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.(वार्ताहर)