आंबेगाव तालुक्यात कोरोना लसीकरणाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:04 AM2021-05-04T04:04:14+5:302021-05-04T04:04:14+5:30
मंचर उपजिल्हा रुग्णालय, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण केले जात असून, गावोगावी लसीकरण मोहीम हाती घेण्यात ...
मंचर उपजिल्हा रुग्णालय, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण केले जात असून, गावोगावी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे यापूर्वी दोन दिवस कोरोना लसीकरण करण्यात आले होते. गावातील लसीकरण राहिलेल्या ग्रामस्थांसाठी तिसऱ्यांदा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी लस उपलब्ध करून दिली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे येऊन लसीकरणात सहभाग नोंदविला. आरोग्यसेविका अर्चना निंबाळकर, डॉ. नीलम घोडके, डॉ. पूजा बहिर, डॉ. संतोष पबलकर, आरती पिंगळे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे आदींनी लसीकरणाची व्यवस्था पाहिली. या वेळी दोनशे नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यसेविका अर्चना निंबाळकर यांनी दिली. नागरिकांनी लसीकरण केले तरी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे या बाबी प्राधान्याने कराव्यात, असे आवाहन श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे यांनी या वेळी केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व ग्रामस्थांनी ही लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवली. फोटोखाली : वडगाव काशिंबेग येथे कोरोना लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.