अतिवेग, लेन कटिंगमुळे एक्स्प्रेसच्या अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:02 AM2019-01-11T01:02:40+5:302019-01-11T01:03:06+5:30

द्रुतगती मार्ग : अवजड वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन

Acceleration due to lane cutting, increased accidents due to accidents | अतिवेग, लेन कटिंगमुळे एक्स्प्रेसच्या अपघातांत वाढ

अतिवेग, लेन कटिंगमुळे एक्स्प्रेसच्या अपघातांत वाढ

Next

विशाल विकारी 

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांचा अतिवेग व लेन कटिंग अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. शुक्रवारी या मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या अपघात याच कारणांमुळे झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातात निष्पाप पाच जणांचा बळी गेला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा ते खोपोली फुडमॉल हा घाट परिसर आहे. त्यामुळे या भागात सातत्याने वाहतूककोंडी व अपघात होतात. या परिसरात अवजड वाहनांच्या चालकांकडून होणारी लेन कटिंगची मोठी समस्या आहे.

घाट चढताना किंवा उतरताना या परिसरात सर्रास लेनच्या शिस्तीचे उल्लंघन होताना पाहायला मिळते. लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या असतानाही अवजड वाहनांच्या चालकांकडून वारंवार नियमांचा भंग केला जात आहे. तसेच या वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्तीची माल वाहतूक केली जाते. त्यामुळे अशी वाहने घाट परिसरात बंद पडण्याचे प्रकार घडतात. आरटीओने घालून दिलेल्या नियमांना आर्थिक बाजूने बगल देत या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असते.

इंधन वाचविण्यासाठी वाहन न्यूट्रल
१शनिवार व रविवार, सलग सुटी व गर्दीच्या काळात अवजड वाहनांना घाट परिसरात बंदी घालण्यात येते. यानंतर मात्र एकाच वेळी ही वाहने सोडली जात असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. बहुतांश वेळा घाट उतरताना अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्याकरिता वाहन न्युट्रल करतात. त्यामुळे वेळप्रसंगी ब्रेक न लागणे, नियंत्रण सुटणे असे प्रकार घडून अपघात होतात.

लेनचे नियम पाळले, तर दुर्घटना टळेल
शुक्रवारी अपघात झालेला सिमेंटचा ट्रक लेन कटिंग करत वेगाने पहिल्या लेनमधून भरधाव जात होता. या वेळी तीव्र वळण व उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रक पुण्याच्या दिशेने जाणाºया वाहनांच्या लेनवर पडला. हाच ट्रक ठरवून दिलेल्या तिसºया लेनमधून नियंत्रित वेगात गेला असता, तर कदाचित ही दुर्घटना टळली असती.
 

Web Title: Acceleration due to lane cutting, increased accidents due to accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे