कंत्राटी पोल्ट्री व्यावसायिकांच्या मागण्या मान्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:13 AM2021-09-08T04:13:54+5:302021-09-08T04:13:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क निरगुडसर : आंबेगाव तालुक्यामधील पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांचा मेळावा मेंगडेवाडी येथे नुकताच गणराज मंगल कार्यालयात पार पडला. ...

Accept the demands of contract poultry traders | कंत्राटी पोल्ट्री व्यावसायिकांच्या मागण्या मान्य करा

कंत्राटी पोल्ट्री व्यावसायिकांच्या मागण्या मान्य करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

निरगुडसर : आंबेगाव तालुक्यामधील पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांचा मेळावा मेंगडेवाडी येथे नुकताच गणराज मंगल कार्यालयात पार पडला. या मेळाव्याला पोल्ट्री व्यावसायिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आंबेगाव-शिरूर येथील १५० पोल्ट्रीधारक शेतकरी या मेळाव्यात उपस्थित होते. या वेळी शासनाने कंत्राटी पोल्ट्री व्यावसायिकांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोल्ट्री व्यावसायिकांनी दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक आपत्ती वादळ, महापूर, बर्ड फ्लू त्याचबरोबर मागील वर्षांपासून कोरोनामुळे पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पोल्ट्री व्यवस्थापन करण्यासाठी होणारा खर्च वाढत चालला आहे. गरीब शेतकऱ्याकडे स्वतःचे भांडवल नाही म्हणून कंपनीवर अवलंबून राहावे लागते. त्यात कंपनी एफएसआर हत्याराचा वापर करून मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला अल्प मोबदला देत आहे. मिळणाऱ्या मोबदल्यामधून शेतकऱ्यांनी विजेची बिले, ग्रामपंचायत कर, कामगारांचा खर्च, बँकेचे कर्ज, पोल्ट्री व्यवस्थापनाचा खर्च कसा भागवायचा यासाठी जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक शेतकरी एकवटले आहेत. कंपन्यांनी चालवलेली लूट व फसवणूक यापुढे सहन केली जाणार नाही, असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे. या वेळी आंबेगाव-शिरूर तालुका पोल्ट्री असोसिएशन अध्यक्ष प्रकाश तापकीर, नवनाथ थोरात यांनी पोल्ट्री व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.

Web Title: Accept the demands of contract poultry traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.