आधी मागण्या मान्य करा; त्यानंतर मोजणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:25+5:302021-08-27T04:16:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : टाकळकरवाडी (ता. खेड) रेल्वे प्रकल्पासाठी मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी हुसकावून लावले. आधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : टाकळकरवाडी (ता. खेड) रेल्वे प्रकल्पासाठी मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी हुसकावून लावले. आधी आमच्या मागण्या मान्य करा, त्यानंतर आमच्या शेतजमिनीची मोजणी करा असा सज्जड दम भूसंपादन कर्मचारी व मोजणी कर्मचाऱ्यांना देऊन शेतकऱ्यांनी शेत जमिनीची मोजणी करू न देता त्यांना हुसकावून लावले.
नाशिक हाय स्पीड ब्राडगेज रेल्वेसाठी गावोगावी जमीन संपादनांच्या नोटीसा, मोजणी करण्याचे काम, खुणा निश्चीत करणे इत्यादी कामे सुरू आहे. टाकळकरवाडी (ता. खेड) येथे भूकरमापक उपअधिक्षक भूमी अभिलेख खेड, महसूल अधिकारी, तलाठी इत्यादी जण मोजणी करण्यासाठी आले होते. ग्रामस्थांना समजताच एकत्र येत मोजणीस विरोध केला. त्यांना माघारी पाठविले. आमच्या मागण्यांचा आधी विचार करून ठोस निर्णय द्या तरच मोजणी होईल. टाकळकरवाडी ग्रामस्थांनी प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले होते. आमच्या बारमाही विहिरी, बागायत क्षेत्र, जिरायत शेतीबाबत कुठलेच ठोस आश्वास प्रशासनाने दिले नसून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. बाधीत क्षेत्रांतील जमिनीपूर्व पश्चिम दिशादर्शक आहे. त्यामधूनच रेल्वे भूसंपादन होत असल्याने जमिनीचे दोन पडतात. त्यामुळे वहिवाट करता येणार नाही व उर्वरित जमिनीचा भोगवटा घेण्यांत अडचणी येणार आहे. बागाईत जमिनीत वहीवाटीसाठी क्षेत्र राहत नाही. अनेक शेतकरी रेल्वे प्रकल्पा मुळे भूमीहीन होत आहे. या परिसरात बागाईत जमिनी आहे प्रथम पुणे-नाशिक बायपास, नंतर रेल्वे, व नंतर पी.एम.आर.डी यामुळे शेतकरी भूमीहीन, अल्पभूधारक होणार आहे. रेल्वे अधिकारी, महसूल विभाग यांनी बाधीत शेतकरी यांच्याबरोबर चर्चा करण्यांची मागणी केली आहे.
चौकट
रेल्वे प्रकल्पासाठी जात असलेली शेतजमिनी कोट्यवधी रुपयांच्या आहेत. काही शेतकऱ्यांची तुटपुंजी शेतजमीन रेल्वेसाठी जाणार असून ते आयुष्यभर भूमीहिन होणार आहे. रेल्वे मार्ग २५ मीटरचा होणार आहे. तसेच रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुने ३० मीटर अंतरादरम्यान रेडझोन पडणार आहे. रेड झोनमध्ये यापुढे शेतकऱ्याला कुठलाही उद्योगधंदा, घर बांधता येणार नाही. त्या जमिनीची किंमत शुन्य होणार आहे. त्याबदल्यात मिळणारा मोबदला तुंटपुजा आहे. त्यामुळे रेडझोनसाठी लागणारी जमीन रेल्वेने घ्यावी व गेल्या तीन चार वर्षांतील खरेदी विक्रीचे व्यवहार व खुल्या बाजारातील व्यवहार त्यांच्या पाचपट शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा, ही मागणी मान्य करून रेल्वे मार्गात येणाऱ्या विहिरी, फळझाडे, पाईपलाईन यांचाही योग्य मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.