डिजिटल संकल्पनेचा अंगिकार करावा : डॉ. रघुनाथ माशेलकर; ‘डिजिटल चतुर’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:12 PM2018-01-02T16:12:24+5:302018-01-02T16:14:37+5:30

गतिमान जगात टिकून रहायचे असेल तर डिजिटल इंडिया संकल्पनेचा सर्वांनी अंगीकार करावा, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. ‘डिजिटल चतुर’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन माशेलकर ह्यांच्या हस्ते झाले.

Accept Digital Concept: Dr. Raghunath Mashelkar; Publication of 'Digital Chatur' book in Pune | डिजिटल संकल्पनेचा अंगिकार करावा : डॉ. रघुनाथ माशेलकर; ‘डिजिटल चतुर’ पुस्तकाचे प्रकाशन

डिजिटल संकल्पनेचा अंगिकार करावा : डॉ. रघुनाथ माशेलकर; ‘डिजिटल चतुर’ पुस्तकाचे प्रकाशन

googlenewsNext
ठळक मुद्देस्मार्ट फोन हा आपला सखा, मार्गदर्शक व सवंगडी : रघुनाथ माशेलकरडॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या ‘डिजिटल चतुर’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : बहुविध क्षेत्रातील आॅनलाईन सेवांमुळे जीवन सुकर व सुसह्य झाले आहे. संगणक युगातील स्थित्यंतराचा वेग प्रचंड आहे. अवघे विश्व व्यापून टाकण्याची क्षमता तंत्रज्ञानात आहे. या गतिमान जगात टिकून रहायचे असेल तर डिजिटल इंडिया संकल्पनेचा सर्वांनी अंगीकार करावा, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या ‘डिजिटल चतुर’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन माशेलकर ह्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे प्रमुख विशाल सोनी उपस्थित होते. पुस्तकाला माशेलकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
माशेलकर म्हणाले, ‘स्मार्ट फोन हा आपला सखा, मार्गदर्शक व सवंगडी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संगणक प्रणालीमुळे या क्षेत्रात क्रांतीच होणार आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. रोगाचे अचूक निदान कमी खर्चात व जलदगतीने त्यामुळे होईल. त्यामुळे रोगावरील उपचारांची परिणामकारकता वाढेल. दिव्यांग व्यक्तीही संगणकाच्या सहजसुलभ वापरामुळे परावलंबी जीवनापासून बहुतांशी मुक्त होतील व चांगले जीवन जगू शकतील.’
‘गेल्या दशकात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील सर्व आर्थिक-सामाजिक-राजकीय चित्रे, धोरणे आणि समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व उपग्रहीय संवादमाध्यमांचा मोठा वाटा आहे. डिजिटल चतुर ही एक अशी व्यक्तिरेखा आहे की जिला स्मार्ट फोन, संगणक, इंटरनेट यांचा वापर करणे जमले आहे. आजच्या काळात आपणही डिजिटल चतुर होण्याची गरज आहे’, असे मत डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Accept Digital Concept: Dr. Raghunath Mashelkar; Publication of 'Digital Chatur' book in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.